April 24, 2026 3:24 pm

डोक्यात लोखंडी घसरगुंडी पडली अन्.; पुण्यातील धक्कादायक घटना

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

सोसायटीच्या आवारात बसविण्यात आलेली लोखंडी घसरगुंडी डोक्यात पडून चिमुकल्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना हडपसरमधील मगरपट्टा भागात घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणात दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी सोसायटीतील अध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

अनिका नवनाथ देवीकर (वय साडेचार वर्ष) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत तिचे वडील नवनाथ पांडुरंग देवीकर (वय ३४, रा. वेदविहार सोसायटी, नोबल हाॅस्पिटलजवळ, मगरपट्टा, हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तकार दिली आहे. त्यानूसार, सोसायटी अध्यक्ष, तसेच पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ७ एप्रिल रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास अनिका सोसायटीच्या आवारात खेळत होती. सोसायटीकडून आवारात लहान मुलांसाठी खेळणी बसविली आहे. सोसायटीच्या आवारातील लोखंडी घसरगुंडी अनिकाच्या डोक्यावर पडली. डोके, चेहरा, मानेला गंभीर दुखापत झाली. बेशुद्धावस्थेतील अनिकाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

सोसायटीच्या आवारातील घसरगुंडी व्यवस्थित बसविली नव्हती. ती काढून टाकण्याबाबत अनिकाचे वडील नवनाथ यांनी सोसायटीतील पदाधिकाऱ्यांना सांगितले होते. याबाबत वारंवार तक्रार दिली होती. मात्र, सोसायटीतील पदाधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही न केल्याने दुर्घटना घडल्याचे अनिकाचे वडील नवनाथ देवीकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोसायटीतील पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक साने तपास करत आहेत.

गेल्या काही दिवसाखाली मद्यधुंद अवस्थेतील कार चालकाने समोरून येणाऱ्या दोन दुचाकीना जोरदार धडक दिली आहे. या भीषण अपघातात एका दुचाकीवरील दोघांचा जागीच मूत्यू झाला आहे. तर दुसऱ्या एका दुचाकीवरील एका महिलेसह दोघे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर सासवड येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. रविंद्र गोपाळ काकडे (वय ६५) आणि महेद्र संपत काकडे( वय ५३, दोघेही रा. पांगारे ता. पुरंदर) अशी अपघात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर तुकाराम जयवंत पोमण (वय ६०) आणि सुरेखा तुकाराम पोमण (वय ५०, दोघेही रा. पिंपळे, ता. पुरंदर) हे पती पत्नी गंभीर जखमी आहेत. याप्रकरणी कारचालक अक्षय सुहास परख ( वय ३०, रा. अँमेनोरा हडपसर पुणे. मुळ रा. नेहापुजा कोऑपरेटीव्ह सोसायटी मिटानगर, गोरेगाव वेस्ट मुबई) याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रकाश राजाराम काकडे (वय ४०, रा पांगारे) यांनी सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!