ताडोबातील तारा आणि चंदा वाघांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात यशस्वीरित्या स्थानांतर झाले आहे. शनिवारी पेंच व्याघ्र प्रकल्पातील लाडो वाघीणही सह्याद्रीत येत आहे. वन्य जीव विभागाचे पथक गुरूवारी रात्री लाडो वाघीणीला घेवून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे रावना झाले आहे.
तब्बल ८५० किलोमीटरचा प्रवास करत लाडो वाघीणाला घेवून शनिवारी पथक येथे पोचत आहे. त्यामुळे त्यांचे स्थानांनतर यशस्वी होणार असल्याचा विश्वास वन्य जीव विभागाने व्यक्त केला आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून चंदा आणि तारा वाघिणीचे यशस्वी स्थानांतर झाले आहे. त्यानंतर पेंच व्याघ्र प्रकल्पातील आणखी एख वाघीणीचे सह्याद्रीत आगमन होत आहे. गुरुवारी रात्री उशिरा पेंच व्याघ्रप्रकल्पातून लाडो नावाच्या वाघीणीला घेवून वन्य जीव विभागाचे पथक वाघीण सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाकडे रवाना झाले आहे. सुमारे ८५० किलोमीटरपेक्षाही जास्त प्रवास करत लाडो वाघीण आज रात्री उशिरा किंवा शनिवारी पहाटे सह्याद्री व्याघ्रपकल्पात पोचण्याची शक्यता आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे पथक काही दिवसांपासून पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघिणीला नेण्यासाठी थांबले होते. ज्या वाघीणेचे स्थानंतरक होणार होते. ती वाघीण गर्भवती असल्याचे स्पष्ट जाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात लाडो वाघीणेचे निवड करण्यात आली आहे. दीर्घकालीन पुनरुज्जीवन प्रयत्नांचा एक भाग म्हणून सह्याद्रीत स्थनांनतर होणारी लाडो तिसरी वाघीण आहे.
यापूर्वी आठ डिसेंबर २०२५ ला चंदा तर २४ जानेवारीला तारा असा दोन वाघीण ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थानांनतरीत झाल्या. दोन्ही वाघीणी सह्याद्रीच्या वातावरणाशी जुळले आहे. त्यातील चंदा वाघीणीची सेनापती नर वाघासोबत मीलन झाल्याची दाट शक्यता वन्यजीव विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे वाघांची संख्या वाढण्याची शक्यता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सह्याद्री लाडोसाठी अनुकूल
पेच व्याघ्र प्रकल्पातील स्थानांतर होणारी वाघीण लाडो नावाने प्रसिध्द आहे. ती वाघीण चार वर्षाची आहे. तीला पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील नागलवाडी परिसरातून जेरबंद केले आहे. त्यानतर तीला सह्याद्रीकडे रवाना करण्यात आले आहे. लाडो नावाने प्रसिध्द असलेली वाघिण तरुण, सदृढ आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वातावरणालाही ती अनुकूल ठरेल, असे तज्ञांचे मत आहे.











