April 23, 2026 6:30 pm

*मोटार-दुचाकी अपघातात भिलारच्या तरुणाचा मृत्यू

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पाचगणी- महाबळेश्वर रस्त्यावर भोसे येथे काल रात्री मोटारीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात भिलार येथील तरुणाचा मृत्यू झाला. ऋषभ नरेंद्र मेहता (वय ३०) असे त्याचे नाव आहे.

पाचगणी पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, की गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी राधिका फरांदे आणि त्यांचे मित्र निखिलकुमार बारिया हे हॉटेल विठ्ठल कामत येथे आले होते. याच दरम्यान महाबळेश्वरकडून पाचगणीच्या दिशेने मोटार (एमएच ०५ जीडी ००१८) भरधाव येत होती.

या मोटारीने समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात आपली गाडी विरुद्ध दिशेला नेली आणि पाचगणीकडून महाबळेश्वरकडे जाणाऱ्या दुचाकीला (एमएच ११ डीएल २२२२) समोरासमोर धडक दिली. या अपघातात दुचाकीचालक ऋषभ मेहता रस्त्याच्या कडेला फेकला गेला. अपघात घडताच नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली.

या वेळी ऋषभच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती, तसेच त्याच्या डोक्याला आणि हातालाही मोठी इजा झाली होती. घटनास्थळी उपस्थित असलेल्या राधिका फरांदे व त्यांच्या मित्राने जखमी तरुण आपलाच मित्र असल्याचे ओळखून तत्काळ पोलिस आणि रुग्णवाहिकेला पाचारण केले.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी ऋषभला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवले. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी मोटारचालक आकाश जयदास पाटील (वय ३३, रा. डोंबिवली ईस्ट, ठाणे) याला ताब्यात घेतले आहे. पाचगणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!