April 23, 2026 3:57 pm

*विभीषणाच्या भूमिकेसाठी विजय सेतुपती?

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

भारतीय चित्रपटसृष्टीतील बहुप्रतिक्षित ‘रामायण’ या भव्यदिव्य चित्रपटाबाबत नवनव्या चर्चा सुरू असतानाच आता आणखी एक महत्त्वाची बाब समोर येत आहे. रणबीर कपूर आणि यश प्रमुख भूमिकेत असलेल्या या चित्रपटात अभिनेता विजय सेतुपती सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विशेष म्हणजे, त्याच्याकडे रावणाचा भाऊ आणि धर्माची बाजू घेणाऱ्या विभीषण या व्यक्तिरेखेची जबाबदारी सोपवली जाणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “विजय सेतुपती आणि रामायणच्या निर्मात्यांमध्ये प्राथमिक चर्चा सुरू आहे. विभीषण हे पात्र कथानकातील अत्यंत महत्त्वाचं आणि निर्णायक स्थान राखणारं असल्यामुळे, ही भूमिका चित्रपटाच्या प्रवाहात मोठी भूमिका बजावणारी ठरणार आहे. मात्र, याबाबत अद्याप निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण हा चित्रपट हिंदू पुराणकथांवर आधारित असून, तो दोन भागांत प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग दिवाळी २०२६ तर दुसरा भाग दिवाळी २०२७ रोजी प्रदर्शित होणार आहे. रणबीर कपूर प्रभू रामाच्या भूमिकेत दिसणार असून, यश रावण साकारत आहेत. सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी झळकणार आहेत.

याशिवाय सनी देओल, रवी दुबे, काजल अग्रवाल, रकुल प्रीत सिंग, अरुण गोविल, कुणाल कपूर यांचाही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये समावेश आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!