आईने आपल्या मुलीला मोबाईलचे व्यसन सोडवण्याच्या हेतून नातेवाईकांकडे पाठवले होते. तिचे मोबाईलचे व्यसन सुटावे आणि तिने अभ्यासात लक्ष केंद्रित करावे या हेतून नातेवाईकांकडे पाठवले पण नातेवाईकांनी त्या पीडितेशी नको तेच कृत्य केलं.
ही घटना गुजरातमधील अहमदाबादमध्ये घडली.
15 वर्षांच्या भाचीवर मामासह मुलाने केले अत्याचार
घडलेल्या घटनेनुसार, पीडित ही 15 वर्षांची असून तिच्यावर मामा आणि भावाने लैंगिक अत्याचार केला. या घटनेनं मामा-भाची आणि भाऊ-बहीण नावाच्या नात्याला काळिमा फासली आहे. मुलीला मोबाइलचं लागलेलं व्यसन तोडण्यासाठी तिने आपल्याच नातेवाईकांकडे पाठवले होते. तिथेच तिचे लैंगिक शोषण झाल्याचा आरोप आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी पुन्हा घरी परतली असता, तिने सांगितलं की, तिच्यावर मामासह त्याच्याच मुलाने लैंगिक अत्याचार केले. पीडितेच्या कुटुंबाने हेल्पलाइनशी संपर्क साधत चांदखेडा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.
या प्रकरणात एका समुपदेशकाने सांगितलं की, मुलीच्या आईने तिला तिच्या तब्येतीसाठी सुमारे दोन महिन्यांपूर्वी मामाच्या घरी पाठवले होते. जेव्हा तिने आपल्या आई तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन करायची तेव्हा आरोपी आईला सांगायचा की, मुलगी व्यवस्थित आहे आणि चांगलं शिक्षण घेत आहे.
मामाने तिला चुकीचा स्पर्श केला, पीडितेनं घडलेला प्रकार सांगितला
या घटनेनंतर पीडित मुलगी दोन महिन्यानंतर घरी परतली असता, तिने घडलेला एकूण सर्व प्रकार आपल्या कुटुंबाला सांगितला होता. तिच्या मामाने तिला चुकीचा स्पर्श केला होता. तिच्या चुलत भावाने ती झोपेत असताना तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर चती इतकी भयभीत झाली की ती प्रतिकार करू शकली नाही.











