April 23, 2026 7:14 pm

*चिंचखेड फाट्याजवळ ट्रकला धडकून दुचाकीस्वार रोहन काळे जागीच ठार

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

जालना जिल्हयातील अंबड -पाचोड मार्गावरील चिंचखेड फाटयाजवळ पाण्याचे फिल्टर जवळील उतारावर ट्रक उभा होता.या उभ्या ट्रकला पाठीमागून दुचाकीस्वार धडकल्याने यामध्ये दुचाकी युवक या अपघातात जागीच ठार झाल्याची घटना गुरूवारी (ता.5) दुपारी साडेचार पाच वाजेच्या दरम्यान घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंबड -पाचोड महामार्गावर चिंचखेड फाट्यालगत वॉटर फिल्टर जवळील उतारावर गुरूवारी ट्रक उभा होता. अंबड शहराकडून आपल्या मामाकडे राहत असलेला रोहन मोहन काळे (वय 20) वर्ष हा बिड जिल्हयातील गेवराई तालुक्यातील आडगाव येथील असुन तो शिक्षणासाठी अंबड तालुक्यातील पागीरवाडी येथे मामाकडे शिक्षण घेत होता.या वर्षी रोहन हा बारावीला होता.

तो अंबड शहराकडून रोहन काळे व त्याच्या सोबत एक मित्रासोबत पागिरवाडीकडे दुचाकी वरून जात असताना रस्त्यात उभा असलेल्या ट्रकला पाठीमागून धडकल्याने या अपघातात गंभीर जखमी झाल्याने रोहन काळे हा जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.तर त्याचा मित्र गाडीवरून खाली दूरवर जावून पडला यामधे तो सुदैवाने बचावला आहे.अपघातातील रोहन काळे याला अंबड शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी पागिरवाडी येथील सरपंच गंगाधर जा, बंडू पागिरे, मनोहर जामदरेसह रोहनचे नातेवाईक, ग्रामस्थ, मित्र मंडळी यांनी अपघातस्थळी तात्काळ धाव घेत मदत कार्य केले.

बाजार समितीचे माजी संचालक रमेश पैठणे यांनी स्वत:च्या वाहनातून रोहन काळे ला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. श्र्वविचेदन करण्यात आले. शुक्रवारी (ता.6) त्याच्या मूळगावी बिड जिल्हयातील गेवराई तालुक्यातील आडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थ, नातेवाईक यांनी सांगितले.अंबड पोलिस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती.मात्र पोलिसांनी ट्रॅक अंबड पोलिस ठाण्यात जप्त करण्यात आला आहे.

अंबड – पाचोड मार्गावरील चिंचखेड फाट्याजवळ गुरूवारी ट्रकला दुचाकीस्वार धडकून झालेल्या अपघातात.वीस वर्षे असलेल्या रोहन काळे चा दुर्दैवी मृत्यू झाल्याने या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पोहचली यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!