April 23, 2026 5:23 pm

*मंत्री गिरीश महाजन यांच्या राजीनाम्यासाठी नाशिक रोड ते शालिमार धडकला मोर्चा

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

भारतीय संविधानाचा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान राखण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी बुधवारी (ता. ४) शिव, फुले, शाहू आंबेडकर विचारधारा असलेल्या सर्वपक्षीयांतर्फे नाशिक रोड ते शालिमारपर्यंत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

या वेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. मोर्चाच्या समारोपप्रसंगी शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात मंत्री महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख केला नाही.

मंत्री महाजन यांच्या या कृतीविरोधात बुधवारी हा मोर्चा काढण्यात आला. नाशिक रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला दुपारी एकला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच संविधानाचे वाचन करुन या मोर्चाला प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बिटको चौक, दत्तमंदिर चौक, उपनगर, आंबेडकरनगर, बोधलेनगर, द्वारकामार्गे मोर्चा सायंकाळी पावणेपाचला शालीमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे पोहोचला. यावेळी संविधानाचे वाचन करुन व राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप करण्यात आला. त्यानंतर महिलांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.

घोषणांनी परिसर दणाणाला

मोर्चाप्रसंगी उपस्थितांनी जोरदार घोषणबाजी केली. भारतीय संविधानाचा विजय असो, होश मे आओ होश मे आओ गिरीश महाजन होश में आओ, जोर जुलूम के टक्कर में संघर्ष हमारा नारा है, नाशिक बचाव महाजन हटाव यांसारख्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

मोर्चात डॉ. डी. एल. कऱ्हाड, राजू देसले, माजी नगरसेवक अस्लम मनियार, हरीश भडांगे, जगदीश पवार, लालचंद शिरसाठ, सुधाकर जाधव, रामबाबा पठारे, नयना वाघ, आकाश भालेराव, समीर शेख, भारत निकम मसूद जिलानी, सचिन चव्हाण, शेखर भालेराव, राजाभाऊ वानखेड, राजाभाऊ सोनवणे, राहुल ताजनपुरे, संतोष पाटील, विजय भालेराव, चंद्रकांत भालेराव, तुषार दोंदे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

यांनी दिले निवेदन

मोर्चाच्या समारोपानंतर महिलांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन दिले. याप्रसंगी पुष्पा वावळे, डॉ. प्रमिला पवार, चैताली भालेराव, वासंती दीक्षित, ॲड. स्वाती भालेराव, कल्याणी वाघ, सुरेखा शिंदे, प्रज्ञा जेऊघाले, माया काळे, उज्ज्वला पाळंदे, आशा खरात, आयशा खान, लीना स्वामी, निलोसार सर्फराज आदींनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत मागण्या मांडल्या. सरकारपर्यंत मागण्या पोहोचविण्यात येतील अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिली.

या आहेत मागण्या

मंत्री गिरीश महाजन यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे

तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांना जाहीर केलेला पद्मभूषण पुरस्कार मागे घ्यावा

माधवी जाधव, दर्शना सौपुरे यांना दिलेल्या अमानुष वागणुकीची सखोल, निष्पक्ष चौकशी करावी

सरकारी सेवेत पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनातून वागणूक देऊ नये, तसेच त्यांची चौकशी थांबवावी

प्रजासत्ताकदिनी ध्वजवंदनेसह विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सन्मान देणे सक्तीचे करावे

प्रजासत्ताकदिनी विद्यार्थ्यांना संविधान निर्मितीचा इतिहास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अमूल्य योगदानाबाबत सुस्पष्ट आणि सक्तीचे मार्गदर्शन करावे मंत्री नीलेश राणे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!