राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा आज सकाळी (28 जानेवारी) बारामतीमध्ये भीषण अपघात झाला. या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अजितदादा प्रचारासाठी बारामतीला जात होते. बारामतीत आज सकाळी धावपट्टीवर उतरत असताना विमान क्रॅश झालं. मोठी आग लागली. यातच उपमुख्यमंत्री अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झालाय.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनाची बातमी समोर येताच संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. अनेकांना अजितदादा आपल्यात नाहीत यावर विश्वास ठेवणं कठीण जातंय. पक्षातील त्यांच्यासोबत काम केलेल्या नेत्यांना अश्रू अनावर झाले आहेत. दरम्यान अजित पवार यांच्या निधनाची बातमी ऐकून माजी मंत्री धनंजय मुंडे यांना शोक अनावर झाला आहे. वडील गेल्यानंतर माझ्यासारख्याला वडील नसल्याची जाणीव कधी त्यांनी होऊ दिली नाही असं म्हणतानाचा धनंजय मुंडे यांचा एक व्हिडिओही समोर आला आहे.. अजित पवारांचं अचानक जाणं सर्वांनाच वेदनादायी ठरलं आहे. पक्षातील त्यांच्यासोबत काम केलेल्या नेत्यांना हा धक्का पचवणं जड जात आहे. अजित पवारांच्या अकाली जाणं अनेकांना चटका लावून गेलं आहे.
कधी वडील नसल्याची जाणीव होऊ दिली नाही ..
उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे (अ.प ) अध्यक्ष अजित पवार यांच्या निधनाची बातमी ऐकून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसल्याचा दिसलं. ‘ माझ्यासारखा राजाला वडील नाही त्याची जाणीव त्यांनी कधी होऊ दिली नाही आम्हाला त्यांनी उभं केलं. ” अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे. धनंजय मुंडे यांच्यासाठी ते अत्यंत जवळचे नेते होते. वडिलांच्या जागी असणारे अजित दादा यांच्या निधनाने पक्षातील सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय. कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. अनेकांना विश्वास बसत नाहीये.











