April 19, 2026 9:46 pm

‘गणपतीला सगळ्यात आधी तो दिवा लावतो’- सागरिका घाटगे

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

‘चक दे इंडिया’ फेम अभिनेत्री सागरिका घाटगे आणि माजी क्रिकेटपटू झहीर खान हे स्टार कपल नेहमीच चर्चेत असतं. त्यांची लव्हस्टोरी देखील फिल्मी अशीच आहे. सेलिब्रिटी कपल असलं तरी या कपलकडे आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. दोघांचे धर्म, संस्कृती, भाषा वेगळी असली तरी त्यांनी नेहमीच एकमेकांचा, एकमेकांच्यां संस्कृतीचा, धर्माचा आदर केलाय. आता नुकत्याच एका शोमध्ये माजी क्रिकेटपटू आणि झहीरचा मित्र हरभजन सिंह यानं देखील झहीरचं कौतुक केलंय.

 

हरभजन सिंह आणि त्याची पत्नी गीता बसरा यांच्या युट्यूब चॅनेलवरच्या मुलाखतीच्या कार्यक्रमात सागरिका आणि झहीर सहभागी झाले होते. यावेळी हरभजन यानं झहीरच्या स्वभावाचं कौतुक केलं. टीममध्ये वेगवेगळ्या धर्माचे मित्र होते, पण आम्हाला वेगळं काही जाणवलं नाही. कारण सगळेच एकमेकांच्या धर्माचा आदर करायचे. गणपती उत्सवात तर झहीर सगळ्यात आधी देवासमोर दिवा लावायचा…असं हरभजन म्हणाला.

 

यावर सागरिकानं देखील त्यांच्या सुखी वैवाहिक आयुष्याबद्दल आणि विशेषतः त्यांच्या घरातील गणेशोत्सवाच्या परंपरेबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या. आमच्या घरी दिवाळी, गणेशोत्सव, गुडी पाढवा…असे सण उत्साहात साजरे केले जातात. माझी आई हे सगळे सण करायची, तोच वारसा मी पुढं घेऊन जात नाही. आता झहीर हा केवळ माझ्या आयुष्याचाच नाही, तर माझ्या घरातील हिंदू सणांचाही एक मोठा भाग आहे,” असं तिनं अभिमानानं सांगितलं.

 

झहीरसाठी धर्म कधीही अडथळा ठरला नाही. तिनं असंही सांगितलं की, आमच्या घरी जेव्हा गणपती बाप्पा येतात, तेव्हा झहीर अतिशय उत्साहानं सर्व विधींमध्ये सहभागी होतो.

 

त्यांच्या आंतरधर्मीय विवाहाबद्दल बोलताना सागरिका म्हणाली की, लग्नापूर्वी त्यांच्या कुटुंबात धर्मावरून कोणताही वाद झाला नव्हता. सागरिकाचे वडील झहीरच्या स्वभावावर आणि त्याच्या शिस्तीमुळं प्रभावित झाले होते.

 

फतेहसिंहसोबतचा पहिला गणेशोत्सव

२०२५ मध्ये या जोडप्यानं आपला मुलगा ‘फतेहसिंह खान’ याच्यासोबत पहिला गणेशोत्सव साजरा केला, ज्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!