April 19, 2026 9:53 pm

नवऱ्याची मागणी असह्य, अवघ्या 24 वर्षांच्या कीर्तीने आयुष्य संपवलं

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

हुंड्यासाठी सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून २४ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कर्नाटक राज्यात बंगळुरु येथील येडियूर तलावाजवळ राहणाऱ्या महिलेने आयुष्याची अखेर केली. काही काळापूर्वी ८ लाख रुपये दिले असताना, पती आणि सासरच्या मंडळींनी घर बांधण्यासाठी अधिक पैशांची मागणी करत छळ केल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले.

 

नेमकं काय घडलं?

अवघ्या २४ वर्षांच्या कीर्ती हिने बंगळुरुमधील येडियूर तलावाजवळ आत्महत्या केली. तिच्या लग्नाला जेमतेम दोन वर्षे झाली होती. कीर्तीच्या पालकांनी आरोप केला, की आत्महत्या नसून, हुंड्याच्या लोभामुळे झालेली हत्या आहे.

 

कीर्ती मूळची कर्नाटकातील मधुगिरी येथील रहिवासी होती. तिचे लग्न नोव्हेंबर २०२३ मध्ये गुरुप्रसादशी झाले होते. तिच्या लग्नावर तिच्या पालकांनी ३५ लाख रुपये खर्च केले होते. लग्नाच्या काही महिन्यांनंतर, तिचा नवरा आणि त्याच्या कुटुंबाने तिला पैशांसाठी त्रास देण्यास सुरुवात केली.

 

गेल्या महिन्यात, डिसेंबरमध्ये तिचा नवरा गुरुप्रसादने घर बांधण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी केली. तिच्या पालकांनी ८ लाख रुपये दिले, परंतु छळ थांबला नाही. या त्रासामुळे कीर्तीने आपले जीवन संपवले.

 

हा प्रकार समोर आल्यानंतरही गुरुप्रसादने तिच्या पालकांना खोटे सांगितले की, कीर्ती बेशुद्ध पडली आहे. जेव्हा ते रुग्णालयात पोहोचले, तेव्हा त्यांना आपली मुलगी मृतावस्थेत असल्याचे आढळले. धक्का बसलेल्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

 

मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, अंत्यसंस्कारांसाठी कीर्तीचा मृतदेह मधुगिरी येथे तिच्या कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. पोलिसांनी तिचा नवरा गुरुप्रसाद आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध एफआयआर दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!