April 20, 2026 2:13 am

दोन टर्म माजी आमदाराचा ‘जय महाराष्ट्र’, भाजप प्रवेशाचा ‘पवारां’ना फायदा, राजकीय भूकंपाचं केंद्र ठरलं

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला लातूर जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या माजी आमदाराने पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. औसा तालुक्यातून दोन टर्म माजी आमदार राहिलेले, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते दिनकराव माने यांनी भाजपचा झेंडा हाती धरला आहे. मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयात समर्थक आणि पदाधिकाऱ्यांसह त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

 

‘पवारां’ची ताकद वाढणार

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिनकरराव माने यांचा पक्ष प्रवेश करण्यात आला आहे. सन 1999 आणि 2004 या दोन टर्म मध्ये दिनकर माने शिवसेनेच्या तिकिटावर आमदार राहिले होते. दिनकरराव माने यांनी 2024 मध्ये अभिमन्यू पवार यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभवाचा धक्का बसला होता.

 

अभिमन्यू पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माजी स्वीय सहाय्यक राहिले असून या पक्ष प्रवेशामुळे पवार यांना औसा तालुक्यात अधिक राजकीय ताकद मिळणार असल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

 

“विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना लातूर जिल्ह्यात शिवसेना सक्षमपणे उभी करण्याचे आणि जिवंत ठेवण्याचे काम आम्ही केले, लोकांनी भरभरून प्रेम केले, दोन वेळा आमदार केले, मात्र पुढील काळात शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाचं लातूर जिल्ह्यावर लक्ष नव्हतं. संघटनात्मक पातळीवर शिवसेना कमजोर होत गेली. शिवसैनकांची कामे वेळेवर होत नाहीत, सर्वसामान्यांना न्याय मिळत नाही, या सर्व कारणामुळे महाराष्ट्राचे सक्षम नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सर्वसामान्यांसाठी काम करावं या अपेक्षेने भाजपात पक्षप्रवेश करत आहे.” असे माजी आमदार दिनकर माने यांनी सांगितले.

 

शिवसेना उबाठा आणि मनसेमध्येही नाराजी

दुसरीकडे, ठाकरे बंधूंनी प्रामुख्याने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती केल्याने दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र जागावाटपात मनसेच्या वाट्याला अवघ्या ५३ जागा आल्या आणि मनसेला निवडून येणाऱ्या जागाच दिल्या नाहीत, असा मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा सुरुवातीला आक्षेप होता.

 

दबक्या आवाजात चर्चा

निवडणुकीत मनसेला केवळ ६ जागा जिंकता आल्या, तर शिवसेना उबाठा पक्षाने ६५ जागांवर विजय मिळवला. राज ठाकरे यांच्या करिष्म्याचा फायदा उद्धव ठाकरे यांना झाला. मात्र मनसेच्या उमेदवारांना शिवसेना उबाठा पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांची मदत मिळाली नाही, अशी मनसेमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!