April 24, 2026 1:14 am

ठाकरेंच्या उमेदवाराकडून समाधान सरवणकर पराभूत

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

महाराष्ट्रात 29 महापालिकांचा महासंग्राम पार पडला असून आता प्रतीक्षा लागून राहिली आहे ती म्हणजे निकालाची. यंदाच्या मनपा निवडणुका अनेक कारणांनी खास होत्या. त्यातही काही मनपा गाजवल्या त्या बहुचर्चित मनोमिलनानं. मुंबई त्यापैकीच एक. शहारात यंदा निवडणुकीच्या रिंगणात 20 वर्षांनंतर राजकीय पटलावर ठाकरे बंधू अर्थात उद्धव ठाकरे यांचा उबाठा पक्ष आणि राज ठाकरे यांचा मनसे हा पक्ष युतीच्या बंधनात अडकत निवडणूक एकजुटीनं लढताना दिसला. तर, या युतीला आव्हान दिलं ते म्हणजे शिवसेनेच्या शिंदे पक्षासह भाजप आणि महायुतीतील इतर पक्षांनी. अशा या मुंबई मनपावर झेंडा रोवण्यासाठी प्रत्येक पक्षानं प्रयत्नांची पराकाष्टा केली असून आता नेमके कोणाचे प्रयत्न फळणार आणि हा मुंबईकर मतदार राजा नेमका नेमका कोणाला कौल देणार याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याच उत्सुकतेच्या आणि बृहन्मुंबई महानगर पालिका निवडणूकीच्या निकालाचे अपडेट पाहा एका क्लिकवर.

 

2026 मनपा निवडणुकीदरम्यान मुंबईत अनेक प्रभागांमध्ये गोंधळाची परिस्थिती, पैसे वाटपाचे गंभीर आरोप आणि राजकीय गटांमध्ये हाणामाऱ्या झाल्याचं पाहायला मिळालं. या राजकीय धुमश्चक्रीचा समारोप सांगणारी आकडेवारी आता नेमकी कोणाला सत्तेच्या सिंहासनावर बसवते हे पाहणं महत्त्वाचं असेल. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालादरम्यान आघाडीवर कोण, पिछाडीवर कोण इथपासून कोणाच्या डोक्यावर सजणार विजयाचा मुकूट या सर्व अपडेट पाहा.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!