April 25, 2026 3:54 pm

सिंचन घोटाळ्यावरुन एकनाथ खडसेंचा हल्लाबोल

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

अजित पवार यांना 25 वर्षानंतर आता याची आठवण झाली. पण माझ्या माहितीप्रमाणे 1999 ला मी जलसंपदा मंत्री होतो, त्या कालखंडात अशा स्वरूपाचा कुठला निर्णय झाला असावा की पार्टी फंडसाठी इस्टिमेट वाढवून घ्यावं किंवा पार्टी फंडसाठी अबाऊ टेंडर द्यावं, असं मला आठवत नाहीये. शिवाय असं होऊ देखील शकत नाही. कारण शंभर कोटी जर वाढवायचे असतील तर त्याची इस्टिमेट कॉस्ट जी आहे आधी हजार कोटी, बाराशे कोटी, पाचशे कोटी (Sinchan Scam) अशी असायला हवी. त्याच्यानंतर शंभर कोटी वाढतील. पण जे काही आहे ती अजित दादांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे ती 25 वर्ष अजितदादांनी ही माहिती का दडवली? 25 वर्षे तुम्ही भ्रष्टाचाराला संरक्षण दिलं. मग आता तरी माझी विनंती अशी आहे की जनतेच्या माहितीसाठी आपण तुमच्याकडे असलेली फाईल खुली करावी आणि त्याच्या मधील सत्यता तपासून घ्यावी. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे  यांनी दिली आहे

 

गेल्या अनेक वर्षांपासून सिंचन घोटाळ्यावरुन (Sinchan Scam) भाजप उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना घेरत आलंय. आज त्याच अजित पवारांनी पालिका निवडणुकीच्या प्रचारात सिंचन घोटाळ्यावरुन पलटवार केला आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता 1999 साली आली. मात्र त्याआधीच्या सरकारने सिंचन प्रकल्पाची किंमत वाढवल्याचा आरोप अजित पवारांनी केला आहे.

 

या प्रकल्पाची किंमत 200 कोटी रुपयेच असल्याच एका अधिकाऱ्याने कबुल केल्याचं अजित पवारांनी सांगितलं. तर त्यावेळी भाजप आणि शिवसेनेच्या युतीच्या सरकारने फंडासाठी प्रकल्पाच्या किंमतीत 100 कोटी मागितले.त्यासोबतच अधिकाऱ्यांनीही स्वतःचे 10 कोटी जोडून 200 कोटी प्रकल्पाची किंमत तब्बल 310 कोटी केल्याचा आरोप अजित पवारांनी केला. दरम्यान याच मुद्दयांवर बोट ठेवत आता एकनाथ खडसे  यांनी भाष्य केलंय.

अजित दादांचा सिंचन घोटाळा संदर्भातला जो त्यांच्यावर आरोप आहे. त्या घटनांमुळे जनतेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू आहे. ला जो त्यांच्यावर आरोप आहे. त्या घटनांमुळे जनतेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू आहे. ती फाईल कोणती आहे? ते धरण कोणतं आहे, याची काही माहिती नाही. त्यांनी नुसतं मोघम सांगितलेला आहे. त्यामुळे वस्तुस्थिती समोर आल्यानंतर त्याच्यावर अधिक बोलता येईल. असेही एकनाथ खडसे म्हणाले. अजित दादांनी नंतरच्या काळात याच्यावर कारवाई केली नाही म्हणजे दुसरी बाजू अशी आहे की त्यांना माहिती होतं. की याच्यामध्ये गैरव्यवहार आहे, भ्रष्टाचार आहे. तरी तो भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न अजितदादांनी केलेला दिसतोय असेही एकनाथ खडसे म्हणाले.

अजित पवारांनी भाजपवर सिंचन प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन गंभीर आरोप केला आहे. 1999 ला जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तारूढ झाले तेव्हा माझ्याकडे जलसंपदा खाते आले. तेव्हा पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेची फाईल माझ्याकडे आली. मी पाहिली असता त्यामध्ये या योजनेची रक्कम 310 कोटी रुपये असल्याचं आढळून आलं. मात्र मी अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी या प्रकल्पाची किंमत आधीच्या सरकारने वाढवल्याचे सांगितले. या प्रकल्पाची किंमत 200 कोटी रुपयेच असल्याच त्या अधिकाऱ्याने कबुल केलं. पुढे त्या अधिकाऱ्याने असं सांगितलं की, 100 कोटी रुपये पार्टी फंडासाठी मागण्यात आले होते. मग आम्ही अधिकाऱ्यांनी देखील त्यामध्ये आमचे 10 कोटी वाढवले आणि प्रकल्पाची किंमत 310 कोटी झाली. ती फाईल अजुनही माझ्याकडे आहे. ती जर काढली असती तर हाहाकार माजला असता, असा दावा अजित पवारांनी केला आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!