April 23, 2026 7:50 pm

वलसाड फास्ट पॅसेंजर मध्ये विरार येथून चढणाऱ्या प्रवाशांविरुद्ध तक्रार

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पालघर: दैनंदिन प्रवाशांची लाईफलाईन असणारी वलसाड फास्ट पॅसेंजर या गाडीमध्ये विरार येथे उतरणाऱ्या प्रवाशांना या स्थानकातून गाडीत चढणाऱ्या प्रवाशांकडून अटकाव होत असल्याने तसेच त्यांच्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या पाहून या गाडीतील काही प्रवाशांनी आज रेल्वे मदत केंद्रावर तक्रार केली. बोरिवली येथे आरपीएफ कर्मचाऱ्यांनी येऊन संबंधितांना समज दिल्याची माहिती पुढे आली आहे.

 

 

मुंबई व उपनगरात कामानिमित्त प्रवास करणारे उंबरगाव, बोर्डी, डहाणू पासून वैतरणा पर्यंत प्रवासी हे नियमितपणे वलसाड फास्ट पॅसेंजर मधून प्रवास करत असतात. पूर्वी डबल डेकर डब्यांची ही गाडी गेल्या वर्षी सिंगल डेकर डब्यांमध्ये परिवर्तित झाली होती. डब्यांची संख्या वाढली असली तरीही या डब्यांमधील गर्दी व मर्यादित आकारांच्या दरवाज्यांमुळे यामधून उतरणे व चढण्याची समस्या वाढली आहे.

 

अशा परिस्थितीत विरार पलीकडच्या रेल्वे स्थानकाचे मासिक पास काढून विरार व बोरिवली येथून मोठ्या संख्येने प्रवासी या गाडीत चढत असतात. गाडीमधील सीट मिळण्याच्या प्रयत्नात चढणारी मंडळी दरवाज्यात गर्दी करत असते. त्यामुळे या दोन्ही रेल्वे स्थानकात उतरणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात आडकाठी केली जात असून त्यामुळे नियमितपणे वादविवाद होत असतात. परतीच्या डाऊन दिशेच्या गाडीमध्ये विरारला उतरणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणे असून त्यामध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांचा समावेश असतो. त्यामुळे विरार येथून वैतरणा व पलीकडच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना चढण्यासाठी त्रासदायक ठरत असते.

 

विरार व बोरिवली येथून चढणाऱ्या प्रवाशांच्या दादागिरीला कंटाळून आज डी १ व डी २ येथील काही प्रवाशांनी आज रेल मदत या संकेतस्थळावर तक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने बोरीवली येथून काही आरपीएफ कर्मचाऱ्यांनी या डब्यांमध्ये येऊन संबंधितांना समज दिल्याचे सांगण्यात आले. या गाडीमधील प्रवाशांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी पश्चिम रेल्वेने विरार स्थानकात पोलीस फोर्स कार्यरत ठेवायला हवा तसेच गाडीमध्ये विशेष तिकीट तपासणी पथक कार्यरत ठेवावे अशी मागणी प्रवासी संघटनेकडून केली जात आहे. झालेल्या तक्रारी संदर्भात पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाची संपर्क साधला असता त्यांच्याकडून याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

वलसाड फास्ट पॅसेंजर या गाडीला प्रथम दर्जाचे तीन डबे असून यामध्ये विशेष तपासणी पथक कार्यरत असते. या पथकाकडून मुंबईकडे जाताना वैतरणा रेल्वे स्थानक पूर्वी तर परतीच्या दिशेने बोरिवली पूर्वी अथवा विरार नंतरच तपासणी केली जाते. त्यामुळे विरार पासून दादर पर्यंत दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात अवैद्य प्रवाशांचा प्रवास केला जात असतो. विशेष म्हणजे तिकीट तपासणी करणारे कर्मचारी हे रेल्वे डब्याच्या दरवाजात उभे राहून प्रथम दर्जाचा डबा असल्याचे सूचित करतात. मात्र दादर ते विरार दरम्यान प्रवास करणाऱ्या उपनगरीय क्षेत्रातील प्रवाशांना अथवा रेल्वे कर्मचारी व अधिकाऱ्यांविरुद्ध कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याचे आरोप रेल्वे प्रवाशांकडून केले जात आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!