April 23, 2026 9:00 pm

राज ठाकरे यांचा अण्णामलाईंवर जोरदार हल्लाबोल

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

मुंबई:- मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची आज शिवतीर्थावर तोफ धडालली. राज ठाकरे यांनी मुंबईतील जागा कशा प्रकारे उद्योगपतींच्या घशात घातल्या जात असल्याचा व्हिडीओ दाखवला. यावेळी राज ठाकरे म्हणाले की मुंबईसाठी पूर्वीपासून षडयंत्र रचले जात आहे. मात्र हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला आज कळेल पुढे काय वाढून ठेवले आहे असे म्हणत राज ठाकरे यांनी अनेक दाखले देत जोरदार भाषण केले.

 

राज ठाकरे म्हणाले की मराठी म्हणून मराठी माणसांनी एकत्र येऊच नये असे षडयंत्र आहे. तुम्हाला मुंबईतच घरे नाकारली जात आहेत. काल परवा ती तामिळनाडूतून रसमलाई आली होती. तो सांगतो मुंबई आणि महाराष्ट्राचा संबंध काय ? भ*व्या तुझा काय संबंध इथे यायचा असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी केला. याच्यासाठीच बाळासाहेब म्हणाले होते, हटाव लुंगी आणि बजाव पुंगी. मुंबईत अनेक लोक राहत आहेत. जैन, मारवाडी राहत आहेत. कबुतरांच्या नावाने भडकवलं जात आहे. कबुतरं राहिली बाजूला हे लोक फडफडत आहेत असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

एक निलेशचंद्र जैनमुनी आहेत, ते म्हणतात, कबुतर खाणे, मांसाहारी खाने याच्यातील वाद मिटवण्याची जबाबदारी फडणवीसांनी मंगलप्रभात लोढा यांच्याकडे दिली होती. पण त्यांनी वाद मिटवला नाही. तर वाद भडकवला असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगत पुढे सांगितले की तुम्हाला भडकवण्याचं काम सुरू येथे आहे. मात्र आम्ही एकटे आहोत तरीही सर्वांसाठी आम्ही काफी आहोत. आमच्या वादात जाऊ नका असा इशारा राज यांनी यावेळी दिला.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!