April 23, 2026 7:55 pm

पुणे महापालिका निवडणूक २०२६ : ‘या’ प्रभागांत रंगणार चुरशीची लढत

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें
1) गणेश बिडकर विरुद्ध प्रणव धंगेकर

प्रभाग २४ (डि) 

पार्श्वभूमी :
२०१७ मध्ये रवींद्र धंगेकर यांनी गणेश बिडकर यांचा पराभव केला होता. यावेळी रवींद्र धंगेकर स्वतः मैदानात नसले तरी त्यांचा मुलगा प्रणव धंगेकर ‘धनुष्यबाण’ चिन्हावर (शिवसेना – ठाकरे गट) निवडणूक लढवत आहे.

मुख्य मुद्दे :
या जागेवरून भाजप–शिवसेना युती तुटली आहे. धंगेकर या जागेसाठी ठाम राहिल्याने भाजपला स्वतंत्र उमेदवार द्यावा लागला.

अडचणी :
राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश नवथरे हे धंगेकर माजी सहकारी असून ते मैदानात उतरल्यामुळे धंगेकर यांची मते फुटण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजपचे पुणे निवडणूक प्रमुख म्हणून गणेश बिडकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

2) लहु बालवडकर विरुद्ध अमोल बालवडकर

प्रभाग ९ (डि) – पाषाण, सुस, बालेवाडी

पार्श्वभूमी :
अमोल बालवडकर हे भाजपचे माजी नगरसेवक आहेत. मात्र तिकीट न मिळाल्याने त्यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

मुख्य मुद्दे :
अमोल बालवडकर यांनी भाजप नेत्यांवर ‘गुंडगिरी’चे आरोप केले होते. मात्र त्यांच्या समर्थकांशी संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांच्यावरच उलटा परिणाम होण्याची शक्यता आहे.

अडचणी :
राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले प्रमोद निमण यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. निमण यांचा ‘गावकी–भावकी’चा मोठा प्रभाव आहे. भाजपचे लहु बालवडकर यांना संघ व भाजपच्या पारंपरिक मतांचा फायदा होऊ शकतो.

3) वसंत मोरे विरुद्ध प्रकाश कदम

प्रभाग ३८ – कात्रज–कोंढवा

पार्श्वभूमी :
वसंत मोरे (शिवसेना – ठाकरे गट) आणि प्रकाश कदम (राष्ट्रवादी काँग्रेस) हे दोघेही माजी नगरसेवक आहेत.

मुख्य मुद्दे :
या प्रभागात बहुरंगी लढत पाहायला मिळत आहे. भाजपकडून व्यंकोजी खोपडे, तर शिंदे गटाकडून स्वराज बाबर मैदानात आहेत.

वसंत मोरे फॅक्टर :
वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणूक लढवली असल्याने ते चर्चेत आहेत. मात्र प्रकाश कदम यांचा मजबूत ग्राउंड लेव्हल संपर्क आणि राष्ट्रवादीचा भक्कम पॅनल ही त्यांची मोठी ताकद आहे.

4) प्रशांत जगताप विरुद्ध अभिजित शिवरकर

प्रभाग १८ (डि) – वानवडी 

पार्श्वभूमी :
शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून तिकीट मिळवले आहे.

मुख्य मुद्दे :
भाजपने मोठी राजकीय चाल खेळत काँग्रेस नेते बाळासाहेब शिवरकर यांचे पुत्र अभिजित शिवरकर यांना भाजपमध्ये घेऊन थेट उमेदवारी दिली आहे.

अडचणी :
या प्रभागात मतविभाजन हा सर्वात मोठा घटक ठरणार आहे. वानवडी परिसरात भाजपचा प्रभाव वाढत असून, त्यामुळे प्रशांत जगताप यांच्यासाठी ही लढत सोपी नाही.

5) सोनाली अंदेकर विरुद्ध प्रतिभा धंगेकर

प्रभाग २३ (ब) – रविवार पेठ

पार्श्वभूमी :
ही लढत दोन प्रभावी कुटुंबांमध्ये आहे. एका बाजूला रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, तर दुसऱ्या बाजूला हत्या झालेल्या वनराज अंदेकर यांच्या पत्नी सोनाली अंदेकर आहेत.

मुख्य मुद्दे :
सोनाली अंदेकर सध्या तुरुंगात असल्या तरी ‘अंदेकर फॅक्टर’ या प्रभागात प्रचंड प्रभावी आहे. ‘Neki ka kaam, Andekar ka naam’ अशा रील्समधून त्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार सुरू आहे.

अडचणी :
शिवसेना ठाकरे गटाच्या निकिता मारटकर यांच्याबाबत सहानुभूतीची लाट आहे, कारण त्यांच्या पती व सासऱ्यांची हत्या झाली होती. त्यामुळे या प्रभागातही मतफुटीची दाट शक्यता आहे.

इतर चुरशीच्या लढती

या व्यतिरिक्त सुभाष जगताप, सनी निमण आणि दीपक बोडके यांच्या प्रभागांतील निवडणुका देखील ‘काट्याची टक्कर’ ठरण्याची शक्यता असून, पुण्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!