August 5, 2026 12:52 pm

कृष्णा आंदेकरवर हल्ल्याचा कट उधळला; दोघांना अटक, मुख्य सूत्रधारांसह तिघांचा शोध सुरू

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे, प्रतिनिधी : पुणे गुन्हे शाखेने कृष्णा आंदेकर यांच्यावर हल्ला करण्याचा कट उधळून लावत दोन संशयितांना अटक केली आहे. या कारवाईमुळे मोठी रक्तपाताची घटना टळल्याचा दावा पोलिसांनी केला असून, मुख्य सूत्रधारांसह इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी संशयितांना अडविण्याचा प्रयत्न केला असता दुचाकीवरील दोघेही वाहन जागीच सोडून घटनास्थळावरून फरार झाले. त्यानंतर गुन्हे शाखेने तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक माहितीच्या आधारे वेदांत रोहित सावंत (वय २१, धनकवडी) आणि अथर्व दत्तात्रय खोपडे (वय २१, कात्रज) यांना ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान दोघांनी पोलिसांच्या वाहनाची हालचाल, ताफ्यातील पोलिसांची संख्या आणि वाहन कोणत्या मार्गाने जात आहे, याची माहिती सतत सूरज अशोक ठोंबरे याला मोबाईलद्वारे पुरवल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणात सूरज अशोक ठोंबरे, मानव शरद ढमाले आणि धीरज लखारा यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे. पाठलाग करणाऱ्या आरोपींकडे पिस्तूल असल्याचा पोलिसांना संशय असून, या कटामागील संपूर्ण षड्यंत्र, शस्त्रसाठा आणि इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.

दरम्यान, वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर आंदेकर आणि गायकवाड-ठोंबरे गटातील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. वनराज यांच्या हत्येनंतर आयुष कोमकर आणि गणेश काळे यांच्या हत्या, तसेच सहकारनगर परिसरातील अक्षय म्हस्के यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे या दोन गटांतील वैर आणखी चिघळले आहे. अशा पार्श्वभूमीवर कृष्णा आंदेकर यांच्यावर हल्ला करण्याचा कट उघडकीस आल्याने पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांमधील संघर्ष पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या कारवाईमुळे संभाव्य मोठी रक्तपाताची घटना टळली असून, आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास सुरू आहे. मुख्य सूत्रधार आणि फरार आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांची विशेष पथके विविध ठिकाणी शोधमोहीम राबवत आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!