May 29, 2026 1:15 am

हडपसरमध्ये जिम संस्कृतीच्या आड भयंकर काळाबाजार

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

बॉडी बिल्डिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची बेकायदा विक्री करणाऱ्या अभिषेक खंडू भंडुडे ( २५, रा. हिंगणेमळा, हडपसर) याला हडपसर मध्ये अटक करण्यात आली, त्याच्याकडून मेफेनटर्मिन सल्फेट इंजेक्शनच्या ८२ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

या कारवाईमुळे जिम संस्कृतीच्या आड सुरू असलेल्या धोकादायक औषध विक्रीचा पर्दाफाश झाला आहे. पोलीस अंमलदार नितीन मारुती मुंढे यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हडपसर परिसरात एक जण इंजेक्शनची विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर खंडणीविरोधी पथक-२ आणि गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली. आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडे मेफेनटर्मिन सल्फेट इंजेक्शनच्या बाटल्या आढळल्या. त्याच्याकडे औषध विक्रीचा कोणताही परवाना नसल्याचे तसेच औषधांच्या विक्री व वापराबाबत त्याला कोणतेही वैद्यकीय प्रशिक्षण नसल्याचे उघड झाले.

केवळ आर्थिक फायद्यासाठी तरुणांना तो इंजेक्शने विकत असल्याचे समोर आले आहे. या इंजेक्शनच्या संभाव्य दुष्परिणामांची माहिती असूनही आरोपी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. आरोपी अभिषेकवर तब्बल ११ विविध गुन्हे दाखल आहेत. त्याला पोलिसांनी एक वर्षासाठी अकोला कारागृहात स्थानबद्ध केले होते. तेथून तो नुकताच सुटून आला होता.

काळेपडळ परिसरात तो रिक्षा चालवत असताना हा बेकायदा इंजेक्शन विक्रीचा व्यवसाय ही करीत होता. नशा करणाऱ्यांकडूनही या इंजेक्शनला मागणी असल्याने तसे ग्राहक तो हेरत होता. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुरव करत आहेत.

मेफेनटर्मिन सल्फेट हे औषध मूळतः वैद्यकीय उपचारांसाठी वापरले जाते. शस्त्रक्रियेदरम्यान कमी झालेला रक्तदाब वाढविण्यासाठी हे औषध दिले जाते. मात्र, कमी वेळात आकर्षक शरीरयष्टी तयार करण्याच्या मोहापोटी १२ ते ३० वयोगटातील तरुणांकडून त्याचा गैरवापर होतो. हे इंजेक्शन घेतल्यानंतर शरीरात तात्पुरती ऊर्जा वाढल्यासारखे वाटते, थकवा जाणवत नाही आणि जिममध्ये अधिक वेळ व्यायाम करता येतो.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!