May 28, 2026 11:40 pm

अहिल्यानगरच्या पोलीस मुख्यालयात प्रशिक्षणावेळी स्मोक हॅण्ड ग्रॅनेडचा स्फोट, नेमकं काय घडलं?

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

अहिल्यानगरच्या पोलीस मुख्यालयात प्रशिक्षणादरम्यान स्मोक हॅण्ड ग्रॅनेड फुटल्याची घटना घडली. ही घटना सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत चार प्रशिक्षणार्थी पोलीस जखमी झाले आहेत.

शिवराज पवार, शुभम कावरे, गणेश मढे आणि योगेश सोळुंखे अशी जखमी प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. यापैकी दोघांच्या हाताच्या बोटांना गंभीर इजा झाल्याची माहिती आहे. तर दोन कर्मचारी किरकोळ जखमी आहेत. जमाव पांगवण्याचं प्रशिक्षण देत असताना ही घटना घडली आहे. जखमी प्रशिक्षणार्थी पोलिसांना उपचारासाठी तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी असते. ही जबाबदारी पोलीस चोखपणे पार देखील पाडतात. दिवस असो, रात्र असो, किवा सणासुदीचा काळ असो, पोलीस सदैव आपली जबाबदारी पार पाडतात. पोलीस संकाटाच्या काळात ढाल बनून नागरिकांची सुरक्षा करतात. त्यामुळे पोलिसांबद्दल समाजात आदरपूर्वक भावना आहे. पोलीस सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी काय-काय प्रकारची काळजी घेतात, यासाठी ते काय तयारी करतात, कशाप्रकारे प्रशिक्षण घेतात आणि या दरम्यान चुकून एखादी अप्रिय घटना घडली तर ती किती धोकादायक ठरु शकते हे अहिल्यानगरच्या घटनेतून स्पष्ट होते. नेमकं काय घडलं होतं? याबाबत जखमी पोलिसांनी आणि वरिष्ठांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

या घटनेनंतर जखमी पोलीस कर्मचारी शुभम कावरे यांनी या घटनेबाबत माहिती दिली. “मॉक ड्रिलचा मेमो चालू होता. आमच्याकडे ग्रेनेड होते. आम्हाला त्याची माहिती नसल्याने ते आमच्या हातात फुटले”, अशी प्रतिक्रिया शुभम कावरे यांनी दिली. “आमचा मॉक ड्रिलचा मेमो चालू होता. आमच्याकडे ग्रेनेड दिले होते. आम्ही ऑर्डर आल्यानंतर पिन खोलली आणि जागेवर स्फोट झाला”, अशी प्रतिक्रिया जखमी जवान शिवराज पवार यांनी दिली.

राखीव पोलीस निरक्षक उमेश परदेशी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली. “बकरी ईद निमित्त आम्ही सराव घेत आहोत. प्रत्येक स्टेप सांगत आम्ही पुढे चाललो होतो. पहिल्या स्टेपला काय करायचं, दुसऱ्या स्टेपला काय करायचं, तिसऱ्या स्टेपला काय करायचं, ज्यावेळेस गॅस थ्रो करायची वेळ येते, त्यावेळेस त्यांना दाखवत असताना, सेफ्टी पिन काढाची आणि थ्रो करायचा, ती काढायच्या आधी तिची जी लिव्हर पट्टी असते ती आपल्या हातातच असायला पाहिजे. चुकून संबंधित जवानाकडून ती लिव्हरपट्टी सुटली आणि तो स्फोट झाला”, अशी माहिती राखीव पोलीस निरीक्षक उमेश परदेशी यांनी दिली.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!