June 5, 2026 5:14 am

पुणेकरांसाठी चिंतेची बातमी! उन्हाच्या कडाक्यामुळे धरणांतील पाणीसाठा आटला

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणेकरांसाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. जिल्ह्यात वाढलेल्या तीव्र उष्णतेचा परिणाम आता धरणसाठ्यावर दिसू लागला असून, पुणे शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे.

सध्याची परिस्थिती कायम राहिल्यास आगामी काळात पुण्यावर पाणीकपातीचे संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे धरणांमधील पाण्याची पातळी कमी झाली असली, तरी ३१ मे पर्यंत शहरात कोणतीही कपात केली जाणार नाही.

पुणे जिल्ह्यातील वाढत्या उन्हामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याची मागणी एकीकडे दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे मात्र जिल्ह्यातील अनेक धरणांचा पाणीसाठा कमी होताना पाहायला मिळत आहे. उन्हाळी आवर्तनामुळे आतापर्यंत मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर झाला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रातल्या चार धरणांमध्ये देखील पाणीसाठा कमी होताना पाहायला मिळतोय सध्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये २६.६१ टक्के म्हणजेच ७.७६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

गेल्या वर्षी याच वेळी हा पाणीसाठा २१ .९५ टक्के म्हणजे ६.४० टीएमसी इतका होता, सद्यस्थितीला हा पाणीसाठा जास्त जरी असला तरी हवामान विभागाने वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजानुसार यावर्षी अल निनो  मुळे पाऊस कमी प्रमाणात होणार असून त्यामुळे जर पाऊस पडण्यास उशीर झाला, तर शहराला पाण्याचा नियोजन करण्याची आवश्यकता आहे. नुकतंच राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार यांनी पाण्याच्या बाबतीत एकदा तरी शहरात कुठलीही पाणी कपात करणार नसून पण पाण्याची कमतरता भासू शकते, त्यामुळे त्याच दृष्टीने नियोजन सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

पुणे जिल्ह्यात असलेल्या २६ धरणांमध्ये एकूण पाणीसाठा

धरणनिहाय असलेला पाणीसाठा, टीएमसीमध्ये : टेमघर ०.००, वरसगाव ३.१६, पानशेत ३.५०,खडकवासला १.१०, पवना २.६६, कासारसाई ०.१७,कळमोडी ०.८७, चासकमान १.१२, भामा आसखेड २.९२, आंद्रा १.०९, वडिवळे ०.५८, नाझरे ०.०७, गुंजवणी ०.७६, भाटघर २.६३, निरा देवघर २.८८, वीर ५.२०, पिंपळगाव जोगे ०.६६, माणिकडोह ०.६३, येडगाव १.०८,वडज ०.४३, डिंभे २.०८, चिल्हेवाडी ०.५६, घोड ०.१९, विसापूर ०.१२, उजनी -७.६८, मुळशी ५.४७

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!