वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या परिचारिका संवर्गाच्या प्रशासकीय बदली प्रक्रियेला महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन ने तीव्र विरोध दर्शवला आहे.
या निर्णयाविरोधात आज, राज्यभरात तीव्र निदर्शने करण्यात आली.परिचारिकांमध्ये तीव्र असंतोष आणि मानसिक ताण पाहायला मिळत आहे.संचालनालया कडून सध्या गट-क तांत्रिक, अतांत्रिक आणि विशेषतः परिचारिका संवर्गाच्या प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया राबविली जात आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील परिचारिकांमध्ये प्रचंड मानसिक ताण आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा निर्णय केवळ प्रशासकीय नसून परिचारिकांच्या कौटुंबिक, सामाजिक आणि मानवी जीवनावर गंभीर परिणाम करणारा आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे.
फेडरेशनचे मुख्य आक्षेप आणि मागण्या
१ परिचारिका संवर्गाचे मूळ काम रुग्णसेवा करणे हे आहे, प्रशासन चालवणे नाही. परिचारिकांकडे कोणतीही वित्तीय (आर्थिक) जबाबदारी नसताना त्यांना ‘प्रशासकीय बदलीच्या’ कक्षेत आणणे पूर्णपणे अतार्किक आहे.
२ परिचारिकांच्या बदल्यांसाठी आधीपासूनच एक प्रभावी अंतर्गत बदली व्यवस्था अस्तित्वात आहे.
दुहेरी व अन्यायकारक निर्णय दर तीन वर्षांनी विभागांतर्गत नियमित बदल्या केल्या जातात. असे असताना पुन्हा त्यांच्यावर स्वतंत्रपणे प्रशासकीय बदल्या लादणे हा दुहेरी आणि अन्यायकारक निर्णय आहे. आज ससून मधील परिचारिकांनी निदर्शने करत निषेध नोंदवला याच परिचारिकांबरोबर बातचीत केले आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी चौपाल परिचारिका ससून











