June 5, 2026 6:02 am

शाईफेक झालेल्या विकास लवांडेंना अटक

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. एका खोट्या फिर्यादीवरून विकास लवांडे  यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.

तर विकास लवांडे यांनी त्यांच्या सोशल मिडीयावर पोस्ट करत आपली भूमिका व्यक्त केली आहे. लवांडेंनी एक्सवरती पोस्ट करत म्हटलं की, एका खोट्या फिर्यादीवरून विकास लवांडे यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे गुंड संग्राम भंडारे व इतर सर्व आरोपी मोकाट असून वाघोली पोलीस स्टेशनचे पोलिस एका खोट्या फिर्यादीवरून कसलाही पुरावा नसताना मला अटक करण्यासाठी मला फोन न करता रात्री घरी आले मी घरी नव्हतो. कुटुंबीयांना माझ्या अटकेबाबत निरोप दिला कुटुंबांना घाबरवण्याचा हा प्रयत्न होता काय ? असा माझा सवाल आहे ? पोलीस मला फोन करू शकले असते. मी फरार नाही किंवा माफीवीर नाही. शासनाने मला जरूर अटक करावी मी पोलिसांना सहकार्य करणारा माणूस आहे कारण मी कायदा पाळणारा माणूस आहे, कायदा हातात घेणारा माणूस नाही. सत्यासाठी लढत राहणार सत्याग्रही पद्धतीने जामीन , वकील ,दंड देणार नाही. पुणे पोलिसांनी मला जरूर अटक करावी मी तयार आहे. आता मला पुण्यातून पोलीस #वाघोली पोलीस स्टेशनला घेऊन चाललेले आहेत, अशी माहिती देखील विकास लवांडे यांनी दिली आहे.

यावेळी विकास लवांडे म्हणाले की, ९ तारखेला माझ्यावर जो संग्राम भंडारे आणि गुंडानी जीवघेणा हल्ला केला. त्याप्रकरणी लोणीकाळभोर पोलिस स्टेशनमध्ये माझी फिर्याद आहे. या ९ तारखेच्या हल्ल्याच्या आदल्या दिवशी ८ तारखेला संग्राम भंडारेंच्या भाजपची एक कार्यकर्ता आहे, मी त्या महिलेला ओळखत नाही नलिनीताई वायाळ त्यांच्या फिर्यादीवरून मला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहेत, ते मला चौकशीसाठी वाघोलीला नेलं जात आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नाही, आक्षेपार्ह विधान केलं नाही, असंसदीय भाषा वापरली नाही, पण त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मी काही शब्द वापरले त्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या, पण त्यांनी पोलिसांना त्याचे काय पुरावे दिलेत ते पाहावं लागेल असंही विकास लवांडे यांनी म्हटलं आहे.

पोलिसांनी मी काय बोललो ते पुरावे देखील समोर आणावेत.मी काय बोललो, मी कोणतं विधान केलं,जे महत्त्वाचं वाटलं, त्यांनी सांगायला हवं, पुणे पोलिसांची चोर सोडून संन्याशाला फाशी आहे, माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे गुंड संग्राम भंडारे व इतर सर्व आरोपी मोकाट मात्र आदल्या दिवशीवरून गुन्हा दाखल करून पोलिस मला ताब्यात घेतं आहोत, मी न्यायाची अपेक्षा आहे, मी दंड, वकील द्यायचा नाही, कारण मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मी जेलमध्ये बसेल, मपपुस्कटदाबी करण्याचा हा प्रयत्न आहे, नितेश राणे आणि काही आमदार भंडारेला म्हणत होते त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही, मी वकिल किंवा दंड देणार नाही, मी जेलमध्ये बसेन असंही पुढे विकास लवांडे यांनी म्हटलं आहे.

मला या फिर्यादीबाबत माहिती नव्हती, एक एफआयआर सोशल मिडीया ग्रुपवरती फिरत होती, त्यावरून मला कळलं, मी वकिलामार्फत अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केला ते सर्व सुरू आहे. कोर्टात सुरू आहे, त्यासंदर्भात माझे वकिल फॉलोअप घेत आहेत, मला पोलिसांनी आधी फोन केला नाही, माझ्या वकिलांनी त्यांना फोन केला, त्यांनी माझ्याकडे कधी चौकशी केली नाही, आज मला ते कोणत्या आधारावर ताब्यात घेतलं आहे, ते त्यांनी सांगावं. पोलिसांनी सत्य सांगितलं पाहिजे, असंही पुढे विकास लवांडे यांनी म्हटलं आहे. मला मारण्याच्या, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहे, माझ्यावर दडपशाहीचा प्रकार सुरू आहे, आमच्या पक्षाच्या नेत्यांनी पोलिसांना निवेदन देऊन देखील दिलं मात्र पोलिसांकडून अद्याप सुरक्षा देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!