June 5, 2026 6:56 am

जुन्नरमध्ये बिबट्याचा थरारक हल्ला

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

ओता.जुन्नर गावच्या हद्दीत वाघचौरे वस्तीवर गुरुवारी सकाळी सहा वाजे दरम्यान दोन बहिणी मॉर्निंग वॉक करताना अचानक बिबट्याने हल्ला करून लहान बहिणीला जखमी केले प्रसंगावधान राखून मोठ्या बहिणीने बिबट्याशी भिडून आरडाओरडा करून लहान बहिणीचे प्राण वाचवले.

काव्या महेंद्र वाघचौरे वय.१० रा.वाघचौरे वस्ती,ओतूर ता.जुन्नर जि.पूणे असे बिबट हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. काव्या व तीची १३ वर्षाची मोठी बहिणी कल्याणी गुरुवारी सकाळी आपल्या घरापासून पुढील गोटीशिवार मांदरणे मार्गावर मॉर्निंग वॉक करत होत्या अचानक रस्त्याच्या कडेच्या शेतातून बिबट्याने काव्यावर झडप घातली आणि काव्याच्या पाठीवर दोन ते तीन मोठ्या जखमा केल्या.

या अचानक हल्ल्यामुळे दोन्ही बहिणीनाचा एकच गोंधळ झाला.मात्र कल्याणी ने प्रसंगावधान राखत बिबट्याला हुसकावून लावले आणि आरडाओरड केला.त्यांनतर महेंद्र वाघचौरे व माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले आणि इतरांनी जखमी काव्याला उपचारासाठी ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

तसेच ओतूर वनविभागाला या घटनेची माहिती दिली.प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीहरी सारोक्ते यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.प्रशांत गोरे व डॉ.वैष्णवी ठिकेकर यांनी काव्यावर उपचार केले.तसेच पुढील उपचारासाठी नारायणगाव येथे पाठविण्यात आले.

महेंद्र वाघचौरे म्हणाले की दैव बलवत्तर म्हणून माझ्या मुलीचे प्राण वाचले, वनविभागाने पिंजरा लावून बिबटे पकडून न्यावे.तसेच ओतूरला एवढे मोठे ग्रामिण रुग्णालय असून सुविधा नाही. जर जखमी मुलीला उपचारासाठी नारायणगाव व पुणे येथे घेवून जावे लागत असेल तर ही राजकीय,प्रशासकीय व सामाजिक व्यवस्थेसाठी शरमेची बाब आहे.ओतूर ग्रामिण रुग्णालयात तज्ञ डॉक्टर व स्टाफ नेमणूक करून लवकरात लवकर येथे चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी जेणे करून अस्या बिबट हल्ले व अपघात रुग्णांचे प्राण वाचतील.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!