June 5, 2026 10:23 am

औषध विक्रेत्यांचा उद्या देशव्यापी संप

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

‘सर्रास होणारी ऑनलाइन औषध विक्री, त्यावर मिळणारी भरमसाट सवलत आणि देशात फोफावणारा बनावट औषधांचा बाजार यामुळे देशातील किरकोळ व घाऊक औषध विक्रेत्यांचे कंबरडे मोडले असून, याच्या निषेधार्थ देशपातळीवर २० मे रोजी संप पुकारण्यात आला आहे,’ अशी माहिती पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पारख यांनी सोमवारी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली.

संपात देशातील साडेपंधरा लाख विक्रेते सहभागी होणार असून, यामध्ये पुणे जिल्ह्यातील १५ हजार, तर शहरातील साडेसहा हजार विक्रेत्यांचा समावेश आहे. ‘औषधांवर २० टक्क्य़ांपर्यंतच सवलत द्यावी, असा कायदा असताना ऑनलाइन औषध विक्रीवर ४० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात आहे. त्यामुळे ही औषधे बनावट असल्याचा दाट संशय आहे. कुठल्याच औषधांवर इतकी सवलत देता येणे शक्य नाही. केंद्र सरकारने यावर नियंत्रण आणावे, अशी मागणी आम्ही गेली अनेक वर्षे सातत्याने करत आहोत. याविषयी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, ऑनलाइन औषध विक्रीला स्थगिती असली, तरी राजरोसपणे विक्री होते,’ असे संघटनेचे सचिव अनिल बेलकर यांनी सांगितले. बंदमध्ये मोठ्या रुग्णालयांतील औषध विक्रीची दुकाने सहभागी होणार नसल्याचे संघटनेने स्पष्ट केले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!