May 15, 2026 12:52 pm

एमएमआरमधील 1.14 लाख मीटर रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सध्या सुरू असलेल्या विविध मेट्रो व पायाभूत सुविधा प्रकल्पांअंतर्गत मोठ्या प्रमाणावर बॅरिकेड्स हटविण्याची आणि पावसाळापूर्व तयारीची मोहीम हाती घेतली आहे.

मेट्रो प्रकल्पांमधील 1.14 लाख मीटरहून अधिक बॅरिकेड्स हटवून पूर्ण झालेल्या मेट्रो मार्गिकेखालील रस्ते नागरिकांसाठी खुले केले आहेत.

बॅरिकेड्स हटवल्यामुळे वाहतूक कोंडी कमी होणे, रस्त्यांची उपलब्धता वाढणे, पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होणे तसेच मान्सून काळात प्रवाशांना अधिक सुलभ व सुरक्षित प्रवास सुविधा उपलब्ध होणे अपेक्षित आहे.

एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली तसेच अतिरिक्त महानगर आयुक्त-1 विक्रम कुमार आणि अतिरिक्त महानगर आयुक्त-2 अश्विन मुदगल यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीनुसार विविध प्रमुख मेट्रो मार्गांवर बॅरिकेड्स हटविण्याचे काम मोठ्या प्रमाणात पूर्ण झाले आहे.

विशेषतः ज्या ठिकाणी व्हायाडक्ट, पिअर आणि इतर महत्त्वाची संरचनात्मक कामे अंतिम टप्प्यात पोहोचली किंवा पूर्ण झाली आहेत, अशा ठिकाणी प्राधान्याने बॅरिकेड्स हटवण्यात येत असून त्यामुळे मान्सूनपूर्व काळात रस्त्यांची रुंदी पुन्हा उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच सर्व कंत्राटदार, सल्लागार संस्था आणि प्रकल्प यंत्रणांना स्वतंत्र आपत्कालीन प्रतिसाद पथके, डिवॉटरिंग पंप, आपत्कालीन यंत्रसामग्री, सुरक्षा कर्मचारी आणि 24 तास तयार यंत्रणा तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून पावसाळ्यात प्रवाशांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत राखता येईल.

बॅरिकेड्स हटवलेली ठिकाणे

मेट्रो मार्ग 2ब (डी. एन. नगरमंडाळे) : 18,277 मीटर (88.64%)

मेट्रो मार्ग 4 व 4 अ (वडाळा कासार वडवली गायमुख) : 31,706 मीटर (92%)

मेट्रो मार्ग 5 (ठाणे भिवंडी) : 11,134 मीटर (98.88%)

मेट्रो मार्ग 6 (स्वामी समर्थ नगरविक्रोळी) : 28,952 मीटर (96%)

मेट्रो मार्ग 9 (दहिसर पूर्वमिरा भाईंदर) : 17,275 मीटर (94%)

मेट्रो मार्ग 12 (कल्याण तळोजा) : 7,174 मीटर

मेट्रो मार्ग 7 अ (अंधेरी पूर्वछत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ) : टप्प्याटप्प्याने बॅरिकेड्स हटविण्याचे काम सुरू

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!