पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात एक हॉटेलमध्ये उद्योजकाचा मृतदेह आढळल्यानेमोठीखळबळउडालीआहे. अशोक जैन असे आत्महत्या केलेल्या उद्योजकांचे नाव असून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे . पुण्यात सॅलिसबरी पार्क परिसरातील उद्योजक अशोक मिलापचंद जैन (वय 61) यांचा मृतदेह आपटे रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये आढळला.
शनिवारी दुपारच्या सुमारास या घटनेची माहिती कळताच परिसरात खळबळ उडाली. साध्य पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक जैन घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे कुटुंबीयांनी शुक्रवारी सायंकाळी स्वारगेट पोलिसांकडे ‘मिसिंग’ ची तक्रार नोंदवली होती. यानंतर शनिवारी दुपारी ग्राहक खोलीचा दरवाजा उघडत नसल्याची माहिती हॉटेल कर्मचाऱ्यांनी डेक्कन पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन खोली उघडली असता जैन मृतावस्थेत आढळले. मृत व्यक्तीने विषप्राशन केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अशातच खोलीतील विविध ठिकाणी उलटी झाल्याचे आढळून आले असून, प्रथमदर्शनी हा आत्महत्येचा प्रकार वाटत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.











