लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. मोरवड येथे प्रेमप्रकरणातून सुरू झालेल्या वादानंतर इंस्टाग्रामवरून होत असलेल्या धमक्या आणि मानसिक त्रासाला कंटाळून 25 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
तेजस दिलीप घोडके असे मृत तरुणाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये काही जणांकडून सतत मानसिक त्रास दिला जात असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
तेजसचे एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते. काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता. यानंतर सोशल मीडियावरून धमक्या देणे, बदनामीची भीती दाखवणे तसेच मानसिक दबाव टाकला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या त्रासाला कंटाळून तेजसने मोरवड शेतशिवारातील गट क्रमांक 207 मध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी रेणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 178/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 108 व 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद मृताच्या वडिलांनी दिली असून, सात जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यातील चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास पोउपनि गायकवाड करत आहेत.











