May 14, 2026 5:09 am

उसाच्या शेतात नेऊन महिलेवर बलात्कार

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

शेतात उसाला पाणी देत असलेल्या 30 वर्षीय महिलेवर उसाच्या पिकात नेऊन बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आरोपीने दिली.

तसेच पीडित महिलेच्या पतीने आरोपीकडे या प्रकरणी विचारणा केली असता त्याला जातीवाचक शिवीगाळ केली. ही घटना केज तालुक्यात एका गावात उघडकीस आली. या प्रकरणी एका आरोपी विरुद्ध बलात्कार व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

केज तालुक्यातील एका गावातील 30 वर्षीय पीडित महिलेच्या कुटुंबाने बटईने शेती केली असून या शेतात उसाचे पीक आहे. या महिलेचे सासरे हे आजारी असल्याने त्यांच्यावर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. त्या आजारी सासऱ्याच्या जवळ या महिलेचे पती व सासू होती. 21 एप्रिल रोजी ही महिला एकटीच उसाच्या पिकाला पाणी देत होती.

ती एकटी असल्याची संधी साधून आरोपी आसाराम रंगनाथ जाधव (रा. जाधवजवळा ता. केज) हा महिलेकडे गेला. महिलेस काय करीत आहेस? असे म्हणत त्याने महिलेच्या हाताला धरून ओढत उसाच्या पिकात नेले. याच वेळी महिलेने आरडा ओरडा केला, मात्र जवळपास कोणी नव्हते. त्या नंतर आसाराम जाधव याने तू मला आवडतेस, असे म्हणत बळजबरीने या महिलेवर अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुला जीवे मारून टाकीन, अशी धमकी दिली. त्या भीतीमुळे महिला ही गप्प राहिली.

या प्रकारामुळे मनोधैर्य वाढलेल्या आसाराम याने या महिलेच्या घरासमोरून वाहन घेऊन जात असताना हॉर्न वाजविला. त्यामुळे या महिलेने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती आपल्या पतीला सांगितली. त्या नंतर पतीने जाऊन आरोपीला विचारणा केली असता तुला काय करायचे ते कर असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली. 7 मे रोजी रात्री पीडित महिलेने दिलेल्या तक्रारी वरून आसाराम रंगनाथ जाधव याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात बलात्कार व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम हे पुढील तपास करीत आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!