May 14, 2026 5:11 am

पुण्यातील ‘त्या’ तरुणीची अखेर मृत्यूशी झुंज संपली

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

काही दिवसांपूर्वी पुण्यातील चंदननगर परिसरात एका २२ वर्षीय तरुणीवर जीवघेणा हल्ला झाला होता. एका तरुणाने घरात घुसून धारदार चाकुने तरुणीचा गळा चिरला होता.

यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. या जीवघेण्या हल्ल्यानंतर गळा चिरलेल्या अवस्थेत संबंधित तरुणीने आपल्या भावाला व्हिडीओ कॉल लावून हल्ल्याची माहिती दिली होती. आता या तरुणीचा आज सकाळी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

उजालादेवी दोहरे असं मृत पावलेल्या २२ वर्षीय तरुणीचं नाव आहे. तिच्यावर २९ एप्रिल रोजी तिचा प्रियकर दिलीप राठोड याने हल्ला केला होता. पीडित तरुणीचं घरच्यांनी लग्न ठरवलं होतं. यामुळे तिने प्रियकराशी लग्न करण्यास नकार दिला होता. हाच राग मनात धरून दिलीप राठोडने तरुणीवर हल्ला केला होता. घरात कुणीही नसताना हा हल्ला झाला होता. मात्र मृत्यूपूर्वी तरुणीने कागदावर आरोपी हल्लेखोराचं नाव लिहून जबाब दिला होता. यानंतर पोलिसांनी हल्लेखोर प्रियकर दिलीप राठोडला अटक केली होती. आता अखेर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या तरुणीचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हल्लेखोर दिलीप राठोड (२२) आणि पीडित तरुणी हे पुण्यातील एका नामांकित मॉलमध्ये एकाच ठिकाणी कामाला होते. याच दरम्यान त्यांच्यात ओळख झाली आणि कालांतराने ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. ही तरुणी अलीकडेच आपल्या मूळगावी गेली होती. घरी गेल्यानंतर कुटुंबीयांनी तिचं दुसऱ्या एका मुलासोबत लग्न ठरवलं होतं. जेव्हा ती परत आली, तेव्हा तिने आपला प्रियकर दिलीपला लग्न ठरल्याची माहिती दिली. तसेच आता आपलं लग्न होणार नाही, असं स्पष्टपणे सांगितलं.

मात्र, तरुणीचं लग्न दुसरीकडे ठरत असल्याचं समजताच दिलीप संतापला. घटनेच्या दिवशी तरुणी घरात एकटीच असल्याचे पाहून त्याने थेट तिच्या घरात प्रवेश केला. यावेळी त्याने संतापाच्या भरात तरुणीवर धारदार चाकुने हल्ला केला. तिच्या गळ्यावर वार केले. यानंतर आरोपी फरार झाला. अशा अवस्थेत तरुणीने आपल्या भावाला व्हिडीओ कॉल केला. ‘दादा, मला एका मुलाने मारलं आहे. मला गळ्यातून आवाज काढता येत नाहीये. तू लवकर ये…’ असं बोलून तरुणीचा व्हिडीओ कॉल कट झाला होता.

जखमी तरुणीला जेव्हा पोलीस आणि डॉक्टरांनी विचारले की ‘हल्ला कोणी केला?’, तेव्हा जखमेमुळे तिला बोलणं अशक्य होतं. अशात तिने केवळ खुणेने कागद आणि पेन मागितला. थरथरत्या हाताने तिने त्या कागदावर आरोपीचं नाव ‘दिलीप राठोड’ असं लिहिलं आणि गुन्हेगाराचा चेहरा समोर आला. यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपीला बेड्या ठोकल्या.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!