May 14, 2026 4:14 am

निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

नाशिक शहरातील चर्चेत असणारे TCS धर्मांतरण आणि अत्याचार प्रकरणी मुख्य महिला आरोपी निदा खान हिला पोलिसांनी २५ दिवसांनंतर अटक केली. निदा खान पोलिसांना गुंगारा देत छत्रपती संभाजीनगर येथील नारेगाव परिसरात लपून बसली होती.

तिला गुरूवारी रात्री अटक करण्यात आली. त्यानंतर आज तिला कोर्टात हजर केले असता, तिला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तसेच, निदा खान हिला लपण्यासाठी मदत करत असल्याच्या आरोपाखाली छ. संभाजीनगरचे AIMIM पक्षाचे नगरसेवक मतिन पटेल याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निदा खान गेल्या काही दिवसांपासून कॅसर कॉलनीतील एका फ्लॅटमध्ये राहत होती. विशेष म्हणजे तिच्यासोबत तिचे ४ नातेवाईकही फ्लॅटमध्ये सोबत राहायचे. पोलिसांना तिच्या लोकेशन बदलाची माहिती वेळोवेळी मिळायची परंतु प्रत्येक वेळी तपास यंत्रणेच्या तावडीतून वाचण्यात तिला यश येत होते. अखेर नाशिक क्राइम ब्रांच आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तिला ताब्यात घेण्यात आले. रात्री ११.३० वाजता पोलिसांच्या टीमने तिला अटक केली. या अटकेनंतर सर्वात आधी तिची मेडिकल चाचणी करण्यात आली. त्यानंतर ट्रांजिट वॉरंट प्रक्रियेत तिला संभाजीनगर कोर्टासमोर हजर केले. आता तिला नाशिकला घेऊन जात आहेत. जिथे तिला नाशिकच्या कोर्टासमोर हजर केले जाईल.

नाशिकमधील TCS प्रकरण समोर आल्यापासून पोलीस निदा खानच्या शोधात होती. २५ मार्चपासून ती सातत्याने फरार होती. पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकाने तिचा शोध सुरू ठेवला होता. आरोपी निदा खान वारंवार तिचे लोकेशन बदलत होती. जवळच्या नातेवाईकांनी तिला लपवण्यात मदत केली होती. त्यातच अंतरिम जामिनासाठी तिने प्रयत्न सुरू केला होता. परंतु कोर्टाने तिला दिलासा दिला नाही. २ मे २०२६ रोजी नाशिक कोर्टाने तिची याचिका फेटाळली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या शोध मोहिमेला आणखी वेग दिला.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!