May 14, 2026 5:12 am

विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकासासाठी पीसीयूमध्ये आंतरराष्ट्रीय उपक्रम – कुलपती हर्षवर्धन पाटील

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पिंपरी, पुणे (दि. ८ मे २०२६) विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगाधारित अनुभव मिळावा, जागतिक तंत्रज्ञान समुदायात योगदान देण्याची संधी मिळावी. सॉफ्टवेअर अभियांत्रिकी क्षेत्रात व्यावहारिक कौशल्य विकसित करता यावे यासाठी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड विद्यापीठात विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय उपक्रम राबविले जातात. या सुविधांमुळे अथर्व चव्हाण याची गुगल कंपनीच्या उपक्रमासाठी निवड झाली हा पीसीयू साठी आनंदाचा क्षण आहे असे पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी चव्हाण याचे अभिनंदन करताना सांगितले.

पिंपरी चिंचवड विद्यापीठ मधील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थी अथर्व चव्हाण याची गुगल समर ऑफ कोड २०२६ या प्रतिष्ठित कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. जागतिक स्तरावरील उपक्रमशील प्रतिभावान विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय ओपन सोर्स प्रकल्पांमध्ये योगदान देण्याची संधी या कार्यक्रमातून गुगल द्वारे देण्यात येते.

अथर्व चव्हाण २५ मे ते २४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत गुगल समर ऑफ कोड कॉन्ट्रिब्यूटर म्हणून जागतिक तज्ज्ञ मार्गदर्शकांसोबत चेकस्टाईल या ओपन सोर्स प्रकल्पावर काम करणार आहे. या प्रकल्पासाठी त्याला अंदाजे ९० हजार रुपये मानधन मिळेल.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, व्यवस्थापन प्रतिनिधी नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीयूचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, कुलसचिव डॉ. अनिल महेश्वरी, पीसीईटी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग अधिष्ठाता डॉ. शितलकुमार रवंदळे, पीसीयू प्लेसमेंट विभाग प्रमुख डॉ. प्रणव चरखा, पीसीयू संगणक विभाग प्रमुख डॉ. पल्लवी अहिरे, प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉ. रामदास बिरादार यांनी अथर्व चव्हाण याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
———————————————–

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!