May 14, 2026 5:14 am

आईला शिवीगाळ केल्याच्या रागातून मित्राचा दगडाने ठेचून खून; पुण्यात धक्कादायक घटना

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

 

पुणे : आईला शिवीगाळ केल्याच्या रागातून एका अल्पवयीन मुलाने आपल्या मित्राचाच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील घोरपडी परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून मुंढवा पोलिसांनी अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले आहे.
लोकेश ठेंबरे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो सध्या घोरपडी-मुंढवा परिसरात राहत होता. ही घटना काल रात्री सुमारे १२.३९ वाजण्याच्या सुमारास भाग्यश्री नगर, बी. टी. कवडे रोड, घोरपडी गाव येथील एका मोकळ्या मैदानात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत लोकेश आणि अल्पवयीन आरोपी हे एकमेकांचे मित्र होते. घटनेच्या रात्री दोघेही मैदानात बसून मद्यपान करत होते. मद्यपानादरम्यान दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. या वादाच्या वेळी लोकेश याने आरोपीच्या आईबद्दल शिवीगाळ केली. आईविषयी अपशब्द ऐकल्यानंतर आरोपीचा संताप अनावर झाला.
रागाच्या भरात अल्पवयीन आरोपीने जवळ पडलेला मोठा दगड उचलून लोकेशच्या डोक्यात जोरदार वार केले. या हल्ल्यात लोकेश गंभीर जखमी झाला. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत लोकेशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.
घटनेनंतर मुंढवा पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आईला शिवीगाळ केल्याच्या रागातूनच आपण हा हल्ला केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे.
घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून पुरावे जमा केले आहेत. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक नागरिकांकडून माहिती गोळा करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी अशा वाढत्या गुन्हेगारी घटनांबाबत चिंता व्यक्त केली आहे.
दरम्यान, अल्पवयीन आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मुंढवा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!