May 14, 2026 8:57 am

भांडीसंचासाठी मागितली लाच; कंत्राटी दोन ऑपरेटर जेरबंद

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

बांधकाम कामगारांना शासनाकडून मोफत देण्यात येणाऱ्या गृहोपयोगी भांडी संचासाठी लाच मागणाऱ्या दोन जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (ता. ६) सापळा रचून रंगेहात अटक केली.माढा तालुक्यातील उपळाई बुद्रूक येथील महाराणी लक्ष्मीबाई विद्यालयाच्या आवारात ही कारवाई पार पडली.

याप्रकरणी संशयित विनोद विजय गाडेकर व दिनेश मनोहर वाघमारे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून, ते भांडी वाटप केंद्रात ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत.तक्रारदार बांधकाम कामगाराने शासनाच्या योजनेअंतर्गत मोफत भांडी संच मिळावा, यासाठी २७ मार्च २०२६ रोजी अर्ज केला होता.

लाभ देण्यासाठी आरोपी गाडेकर यांनी सुरवातीला १२०० रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती ही मागणी ५०० रुपयांवर आली. याप्रकरणी तक्रारदाराने १६ एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.

सापळा रचण्यात आला. बुधवारी सकाळी गाडेकर यांनी तक्रारदारास लाचेची रक्कम वाघमारे यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार वाघमारे यांनी पंचांसमक्ष ५०० रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने दोघांना ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत कारवाई करण्याचे काम सुरू होते.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!