May 14, 2026 8:56 am

पर्वती घटनेतील आजोबाचे कोर्टात निर्ल्लजपणे उत्तर

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

तुला कोणत्या कारणासाठी न्यायालयात हजर करण्यात आले आहे, याची माहिती आहे का? असे न्यायालयाने आरोपीला विचारले, त्यावर आरोपीने, ‘मी नातीसोबत बसलो असता, शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली, असे निर्ल्लजपणे उत्तर दिले.

पर्वती येथे स्वतःच्या नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणातील या आजोबाला न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (दि. ८) पोलिस कोठडी सुनावली.

आरोपीने मुलीला खोलीत बोलावून तिला निर्वस्त्र करून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयास दिली. दरम्यान, आरोपीच्या छातीवर मुलीच्या नखांचे ओरखडे आणि ओठांवर चावल्याचे व्रण उमटल्याची माहिती मिळाली आहे. आरोपीला बुधवारी (दि. ६) संध्याकाळी विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते.

आरोपीची बलात्काराच्या गुन्ह्याच्या संबंधाने वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. त्याने अशा प्रकारचे कृत्य इतर कोणासोबत पूर्वी केले आहे का, याची पडताळणी करण्यात येत आहे. आरोपीने यापूर्वी मुलीशी असे कृत्य केले आहे का, याबाबतदेखील तपास करण्यात येत आहे. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी मंजूर करण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी केला.

तपास अधिकारी पोलिस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर यांनी गुन्ह्याच्या तपासाची माहिती न्यायालयास दिली. आरोपीच्या वतीने विधि सेवा प्राधिकरणाकडून वकील देण्यात आला आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!