नसरापूरमधील चिमुरड्या मुलीच्या अत्याचार आणि हत्येची घटना ताजी असतानाच पुणे शहरातील पर्वती भागात असाच एक चीड आणणारा प्रकार घडला आहे. पर्वती येथील एका 70 वर्षांच्या वृद्धाने आपल्या स्वत:च्या नातीवरच अत्याचाराचा प्रयत्न केला.
या मुलीचे आई-वडील हे कामाला जातात, ते घरी नसताना या वृ्द्धाने घरातच नातीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात आता नवी अपडेट समोर आली असून आरोपीने कोर्टात भलताच दावा केला आहे यामुळ मोठी खळबळ उडाली आहे.
पर्वती अत्याचार प्रकरणातील आज कोर्टात हजर करण्यात आले असून आरोपीला 8 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पर्वती पोलिसांकडून तीन दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर काही प्रश्न विचारण्यात आले. कोर्टाने नाव आणि तुला काय केले आहे माहिती आहे का हे विचारले? यानंतर आरोपीने स्वत:चे नाव सांगितले आणि त्यानंतर जे उत्तर दिले त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी का अटक केली असे कोर्टाने आरोपीला विचारले असता एका बाईने चुकीची अफवा उठवली म्हणून मला अटक केली असे आरोपीने कोर्टाला सांगितले.
आरोपीचे मेडिकल करायचे आहे, असे गुन्हे कुठे केले आहेत का याचा तपास करायचा आहे. मोबाईल जप्त करून तपास करायचा आहे. स्वतःच्या नाती सोबत दुष्कृत्य केले, शेजारच्या बाईने साक्ष दिले आहे त्यावरून तिचा जबाब घेतले आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पोलीसांनी तीन दिवसाची पोलिस कोठडी मागितली. तपासासाठी पोलिस कोठडीशिवाय शक्य नाही त्यामुळे पोलिस कोठडी देण्यात आली.
पुण्यातील पर्वती परिसरातून एका 50 वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरात 9 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. नऊ वर्षांच्या बालिकेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या बालिकेकडे पाहून अश्लील इशारे करण्यात आले आणि जबरदस्तीने तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व धक्कादायक प्रकार दारूच्या नशेत घडला आहे. आरोपीने मद्यधुंद अवस्थेत असताना आपल्या नातीसोबत हे लज्जास्पद कृत्य करण्याचा प्रयत्न केला. या नराधम आरोपीवर पर्वती पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान आणि पोक्सो (POCSO Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











