May 14, 2026 11:17 am

नसरापूरच्या घटनेनंतर आता थेऊरमध्ये ६ वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नराधम जेरबंद

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुण्यातील नसरापूर आणि पर्वती येथील घटना ताजी असतानाच, आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हवेली तालुक्यातील थेऊर येथे उन्हाळी सुट्टीसाठी आजोबांकडे आलेल्या एका ६ वर्षांच्या मुलीवर शेजारी राहणाऱ्या नराधमाने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला.या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, नागरिकांनी आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही मूळची पुणे शहरातील असून सध्या उन्हाळ्याची सुट्टी घालवण्यासाठी थेऊर येथील आपल्या आजोबांकडे आली होती. आजोबांच्या घराशेजारी राहणाऱ्या एका ४२ वर्षीय नराधम गिरणी चालकाने या चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. लोणी काळभोर पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांत अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. नसरापूर आणि पर्वती येथील घटनांच्या पाठोपाठ थेऊरमध्ये असा प्रकार घडल्याने पालकांमध्ये भीतीचे आणि नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आरोपीवर कठोर कारवाई करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!