May 14, 2026 5:05 pm

माझ्या नवऱ्याला त्याच गोठ्यात ठेचून मारा; नरसापूर घटनेतील आरोपीची बायको समोर, ढसाढसा रडली

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुण्यातील नसरापूरमध्ये एका साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. 65 वर्षाच्या व्यक्तीला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला असताना आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.आरोपीला मारून टाका, त्याला त्याच ठिकाणी ठेचून मारा, अशी संतप्त प्रतिक्रिया आरोपीच्या पत्नीने दिली आहे.

65 वर्षाच्या नराधमाने साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणानंतर आता पुणेकरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. आरोपी कांबळेला फाशी द्या, असं म्हणत जागोजागी आंदोलनं पहायला मिळात आहेत. दरम्यान या घटनेनंतर आरोपीच्या पत्नीने एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यावेळी संपूर्ण कुटुंबियांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या नवऱ्याने ज्या ठिकाणी चिमुरडीवर अत्याचार केला त्याच ठिकाणी त्याला ठेचून मारा, अशी मागणी करत पत्नी ढसाढसा रडली. तसेच माझ्या बापाने चुकी केली, त्याला कठोरात कठोर शिक्षा द्या, अशी मागणी मुलाने केली आहे.

आरोपीची पत्नी म्हणाली, मला अकरा नातवंड आहेत, ज्या दिवशी मला या घटनेविषयी माहिती मिळाली त्या दिवसापासून माझ्या पोटाच अन्न – पाण्याचा कण गेला नाही. त्या लेकराचा आत्मा काय म्हणाला असेल? तिच्या आईला काय वाटत असेल याचा विचार करून मला काही सुधरेना झालंय. त्याने जिथे अत्याचार केला तिथेच त्याचा ठेचून मारलं पाहिजे. दहा वर्षापासून आमच्याशी संपर्क नाही. मी माझ्या मुलासोबत राहते. बाहेर तो काय करायचा याबद्दल मला माहिती नाही.

तर आरोपीचा मुलगा म्हणाला, जेव्हा माझ्या बापाने स्वत:च्या पुतणीवर अत्याचार केला त्यावेळी आम्ही घरदर सोडलं होतं. त्या दिवसापासून त्याच्यासोबत संबंध संपवला होता. सरकारला विनंती आहे की, चिमुरडीला लवकरात लवकर न्याय मिळावा. चिमुरडीला इतक्या क्रूरतेने मारलं. हा माझा बाप नव्हताच, असं मला म्हणावं वाटतंय..

आरोपीने 1998 मध्ये विनयभंगचा गुन्हा केला होता. त्यानंतर 2015 मध्ये त्याच्यावर पोस्को आणि विनयभंग गुन्हा दाखल झाला होता, पण 2019 मध्ये त्याची सुटका झाली होती. आरोपीची मानसिकताच अशी आहे, असंही गिल यांनी यावेळी स्पष्ट केलं. 65 वर्षाचा आरोपी मजूर म्हणून काम करत होता, असंही पुणे ग्रामीणचे एसपी संदीपसिंग गिल यांनी सांगितलं होतं. अशातच आता पोलीस लवकरात लवकर चार्टशीट दाखल करण्याची तयारी करत आहेत. केस फास्ट ट्रॅकवर चालवण्याचा प्रयत्न चालू आहे. आमची विशेष टीम याचा तपास करत आहे, असंही त्यांनी सांगितलं होतं.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!