May 14, 2026 11:14 pm

महिला अन् विद्यार्थ्यांना विनामूल्य बघता येणार शिवसृष्टी

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आंबेगाव बुद्रुक येथे उभारण्यात येत असलेली शिवसृष्टी अभय भुतडा फाउंडेशनच्या सहकार्यामुळे महिला व १८ वर्षांखालील मुलामुलींसाठी दि.१ मे ते २७ जून यादरम्यान विनामूल्य पाहता येणार आहे.

अभय भुतडा फाउंडेशनच्या सातत्याने मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल आम्ही अभय भुतडा फाउंडेशनचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या देणगीमुळे महिला व १८ वर्षाखालील मुलामुलींना शिवसृष्टी विनामूल्य पाहता येणार आहे.

यानुसार नमूद केलेल्या कालावधीत आम्ही महिला व १८ वर्षांखालील शालेय मुलामुलींसाठी शिवसृष्टी विनामूल्य पाहण्याची सुविधा उपलब्ध करत आहोत, अशी माहिती प्रतिष्ठानचे विश्वस्त व शिवसृष्टीचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी दिली.

शिवप्रेमींनी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाइटच्या माध्यमातून ऑनलाइन स्लॉट बुक करणे गरजेचे आहे. गैरसोय टाळण्यासाठी शिवप्रेमींनी ऑनलाइन बुकिंग केल्यानंतरच शिवसृष्टी पाहण्यासाठी यावे. ऑनलाइन बुकिंग केले असेल तरच आत प्रवेश दिला जाईल याची नोंद घ्यावी,असेही कदम यांनी नमूद केले.

लोकमत सखीच्या संस्थापिका ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतींना अभिवादन करून महाराष्ट्रातील सखी सदस्य आणि कॅम्पस क्लबच्या सदस्यांना या मोहिमेचा लाभघेता येणार आहे. ‘लोकमत’च्या माध्यमातून राज्यातील कॅम्पस क्लब सदस्यांशी बोलल्यानंतर घराघरात शिवसृष्टी पोहोचविण्याचा विचार मनात आला, असे अभय भुतडा यांनी म्हटले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!