May 14, 2026 11:53 pm

2 दिवसांपासून मुलगी बेपत्ता; सिंहगड किल्ल्याजवळ आढळली बॅग

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुण्यातील सिंहगड किल्ल्याच्या परिसरातून बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मनीषा धर्मदास गायकवाड वय (२८) रा. धनेगाव नांदेड (सध्या राहणार बिजलीनगर चिंचवड) असे मृत तरुणीचे नाव आहे.

संबधित तरुणी २८ एप्रिल २०२६ पासून बेपत्ता झाली होती..तिचा मोबाईल, बॅग आणि इतर साहित्य सिंहगड परिसरात आढळून आल्याने कुटुंबीयांनी हवेली पोलीस स्टेशनमध्ये हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मनीषा धर्मदास गायकवाड ही तरुणी दि. २८ एप्रिल २०२६ पासून बेपत्ता होती..तिचा मोबाईल, बॅग व इतर साहित्य सिंहगड परिसरात आढळून आल्याने कुटुंबीयांनी हवेली पोलीस स्टेशनमध्ये हरवल्याची तक्रार दाखल केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवेली पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमने दि. २९ एप्रिल रोजी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवली. मात्र अंधार आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही. त्यामुळे शोधमोहीम दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सुरू करण्यात आली.

दि. ३० एप्रिल रोजी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेत सहाय्यक उपनिरीक्षक गिरे, प्रवीण ताकवणे यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन पथक सक्रिय होते. सुमारे तासाभराच्या शोधानंतर तोफ खाण्याजवळील बुरुज परिसरात संशयास्पद वस्तू आढळून आल्या. तपासादरम्यान तरुणीने बुरुजावरून खोल दरीत उडी मारून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. ही बाब प्रथम कृष्णा मरगळे यांच्या निदर्शनास आली.

यानंतर तानाजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली कृष्णा मरगळे, गणेश सपकाळ, संदीप सोळसकर, संजय चोरगे, उत्तम पिसाळ, संतोष भगत, तेलवडे, वैभव भोसले आदींनी पुढील रेस्क्यू मोहीम हाती घेतली. तानाजी भोसले आणि कृष्णा मरगळे यांनी दोराच्या साहाय्याने रॅपलिंग करत खोल दरीत उतरून मृतदेहापर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. या संपूर्ण कारवाईत रेस्क्यू टीमने खोल दरीत उतरून धाडस दाखवत मोलाची कामगिरी बजावली.

या शोधमोहीमेत वनविभागाचे समाधान पाटील, वायकर तसेच बळीराम वायकर, संदीप कोळी, कैलास झरांडे, नितीन गोळे, राजू बडदे, रोशन पन्हाळकर यांनी सहकार्य केले..अग्निशमन दलातील प्रेमसागर राठोड, ज्ञानेश्वर बुधवंत, तुषार पवार, प्रवीण देसाई, अमोल यादव, सिद्धांत जाधव, अजय सावंत, ज्ञानेश्वर जाधव यांनीही मदत करत सहकार्य केले. घटनेचा पुढील तपास हवेली पोलीस करत असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!