एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमांमध्ये बोलताना सुप्रिया सुळे यांनी मोठं भाष्य केलं होतं. यावेळी बोलताना त्यांनी पवार विरुद्ध पवार होऊ देणार नाही असं म्हटलं तर त्यावर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील एका वाक्यात भाष्य केलं आहे.
नागपूरमध्ये पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, अजित पवारांच्या निधनानंतर मी पहिल्यांदाच नागपूरमध्ये येत आहे. एवढं ऊन असताना देखील कार्यकर्त्यांचा उत्साह भरपूर आहे. हे केवळ अजित दादांवरील प्रेम आहे. त्याचबरोबर जेव्हापासून मी राजकारणात आले आहे. तेव्हापासून मी नेहमी हेच सांगत आले आहे. आमचे कुटुंब वेगळं असणार आहे आणि राजकारण वेगळं असणार आहे. त्यामुळे सुप्रिया ताईंनी सांगितलेली गोष्ट अतिशय चांगली आहे. त्यांनी पवार विरुद्ध पवार लढू नये असं वक्तव्य केलं आहे. ते अतिशय चांगला आहे. आमची सगळ्यांची देखील हीच इच्छा आहे.
एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमांमध्ये बोलताना सुप्रिया सुळे यांनी मोठं भाष्य केलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की, मी कधीही पवार विरुद्ध पवार होऊ देणार नाही. यावेळेस मी होऊ देणार नव्हते. पण आता दादा नाहीत, त्यामुळे काही गोष्टी सांगण्याचे गरजेचे वाटत नाही. जे झाले ते गंगेला वाहिले. पण येथून पुढे मी कुठल्या पवाराच्या विरुद्धात लढणार नाही. वेळ पडली तरी दुसरा निर्णय घेईल. हे परत मी होऊ देणार नाही.











