May 15, 2026 8:26 am

पुणे रेल्वे स्टेशनवर वंदे भारत एक्सप्रेसचा डबा रुळावरुन कशामुळं घसरला?

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

मुंबईवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा अपघात पुणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 3 वर येत असताना झाला आहे. यामुळं प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर येणाऱ्या ट्रेनचे मार्ग बदलण्यात आले.वंदे भारत एक्स्प्रेसचा रुळावरुन घसरलेला डबा पूर्ववत करण्याचं काम सुरु आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या अपघाताचे प्राथमिक कारण समोर आलं आहे.

वंदे भारत एक्स्प्रेस मुख्य लाईन वरून प्लॅटफॉर्म क्रमांक तीनच्या दिशेने जात असताना ट्रेन चा डबा रुळावरून घसरला, अशी माहिती रेल्वे दलातील विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे. मुंबईहून पुणे रेल्वे स्टेशन वरील प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर येत असताना हा अपघात झाला. मुख्य लाईनवरून ट्रेनचे इंजिन पुढे जात असताना 15 नंबरच्या डब्याने ट्रॅक बदलला नसल्यामुळे अपघात झाल्याची माहिती आहे. या अपघाताच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती आहे.

मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला पुणे जंक्शन जवळ अपघात झाल्यानं सोलापूरला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई सोलापूर वंदे भारत मधून प्रवाशांसाठी सोय करण्यात येणार आहे. लवकरच नवीन ट्रेन सोलापूरला जाण्यासाठी येणार आहे. सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रवाशांना प्लॅटफॉर्म वर जाण्याची विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सोलापूरला जाण्यासाठी नवीन गाडी थोड्याच वेळात दाखल होणार आहे. प्लॅटफॉर्म नंबर ३ वगळता इतर प्लॅटफॉर्म वरील सेवा सुरळीत असल्याची माहिती आहे.

मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस गाडी पुणे रेल्वे स्थानकात प्रवेश करत असताना तिचा एक डबा रुळावरून घसरल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम सुरू असून, प्रवासी आपले सामान घेऊन रुळावरून पुढे जाताना दिसत आहेत.

विशेष म्हणजे, नेहमी प्रवाशांचे सामान वाहून नेण्यासाठी शुल्क घेणारे कुली आज मात्र मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. कोणतेही मानधन न घेता ते प्रवाशांचे सामान उचलून त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवत आहेत. या कुलींच्या कृतीतून खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडत आहे.

मुंबईसोलापूर वंदे भारत एक्सप्रेसच्या पुण्या जवळ झालेल्या अपघाताबत चौकशी केली जाणार आहे. पुणे रेल्वे स्टेशन जवळ झालेल्या अपघाताची चौकशी केली जाणार आहे. मध्य रेल्वे विभागाकडून अपघाताची चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे. वंदे भारत एक्स्प्रेसच्या अपघातात सुदैवानं कोणीही जखमी झालेलं नाही. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व ट्रेन इतर प्लॅटफॉर्म वरून वळवण्यात येत आहेत. इतर प्लॅटफॉर्म वरून ट्रेन वळवण्यात येत आहेत. वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे प्लॅटफॉर्म वर पोहोचण्यापूर्वी अपघात झाला असल्याने इतर गाड्यांना उशीर लागण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!