May 15, 2026 8:28 am

क्रिकेटची मॅच संपली अन् भर मैदानात सांडला रक्ताचा सडा

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

क्रिकेट आणि वाद यांच्यातील नाद फार जुन्या काळापासून आहे. मैदानात मॅच खेळताना राडा तर होणारच… इंटरनॅशनल मॅच असो वा गल्लीतल्या पोरांची मॅच, भांडणं सर्रास पहायला मिळतात.

पण जळगावात असं काहीतरी घडलंय, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. जळगावच्या प्रसिद्ध मेहरुण तलाव परिसरात रविवारी रात्री दोन गटांमध्ये वाद झाल्याचं पहायला मिळालं. क्रिकेटच्या मॅचनंतर हा वाद झाला होता. हा वादचं पुढं तुफान हाणामारीत रूपांतर झालं. धारदार शस्त्रांनी एकमेकावर वार केल्यानं तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

क्रिकेट सामना संपल्यानंतर किरकोळ कारणावरून मेहरून तलाव परिसरात दोन्ही गट आमने-सामने आले. तुम्ही कुठले? या प्रश्नावरून वादाची ठिणगी पडली अन् प्रकरण पेटलं. हाणामारीदरम्यान दोन्ही गटांनी धारदार शस्त्रांचा वापर केला. चॉपरसारख्या शस्त्रांनी एकमेकांवर हल्ले करण्यात आले. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये राहुल सोनवणे, चेतन सोनवणे आणि मोहीत महाजन यांचा समावेश आहे.

दोन तरुण एकमेकांच्या जवळ रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत पडलेले असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. जखमींना प्रथम जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. राहुल सोनवणे याला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून विक्रांत राणे, मोहीत महाजन व निलेश सपकाळे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांच्या ताब्यात असलेला मोहीत महाजन जखमी असतानाही त्याच्यावर वेळेत उपचार झाले नाहीत, असा आरोप करण्यात आलाय. गंभीर जखमी असतानाही मोहितला पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आल्याचाही आरोप नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांच्या ताब्यात असताना मोहीतची प्रकृती अचानक खालावली. मोहितला सायंकाळी अचानक अस्वस्थ वाटून छातीत दुखू लागलं. त्यानंतर उलटी होऊन तो बेशुद्ध पडला. त्यानंतर मोहितला नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात दाखल करून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

मोहितला रुग्णालयात नेल्यावर छातीमध्ये चॉपरने वार करण्यात आल्यामुळे तो गंभीर जखमी असल्याचं कळालं. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर देखील प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. तसेच नेहमी गजबजलेला मानला जाणारा मेहरूण तलाव परिसरात दोन गट एकमेकावर धारदार शास्त्रांनी हल्ला केल्यामुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!