May 15, 2026 8:27 am

२९ एप्रिलपासून ‘हे’ नियम पाळा, अन्यथा होणार कडक कारवाई

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कलम ३७ (१) व (३) लागू करण्यात आले आहे. २९ एप्रिल रोजी मध्यरात्रीपासून ते १२ मेपर्यंत हा आदेश प्रभावी राहणार आहे.या कालावधीत विविध प्रकारच्या कृत्यांवर बंदी घालण्यात आली आहे. पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार कोणतेही शस्त्र, दाहक किंवा स्फोटक पदार्थ बाळगण्यास मनाई आहे. दगड, काठ्या, तलवारी किंवा इजा पोहोचवणारी कोणतीही वस्तू सोबत ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे. मोठ्याने घोषणा देणे, वाद्य वाजवणे किंवा समाजात तणाव निर्माण करणारी वक्तव्ये करण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. कोणत्याही व्यक्तीचे प्रतीकात्मक पुतळे किंवा प्रतिमा जाळणे यावरही बंदी आहे. पाचपेक्षा अधिक लोकांचा जमाव करण्यास मनाई आहे.

तसेच पोलीस आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय सभा, मोर्चे किंवा मिरवणुका काढता येणार नाहीत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शासकीय कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. मात्र इतर सर्व नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. शहरात शांतता राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!