पुणे लोकलसंदर्भात एक अपडेट हाती आली असून मंगळवारी पुणे स्टेशनवरुन लोकल सुटणार नाहीत, शिवाजीनगर स्थानकातून लोकल सुटणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
मंगळवार, दि. २८ एप्रिल रोजी दुपारी १ पर्यंत सगळ्या लोकल या शिवाजीनगर स्टेशनवरून सुटणार आहेत. पुणे ते लोणावळा लोकल पुणे स्टेशन वरून सुटणार नसल्याने प्रवाशांना शिवाजीनगर स्थानकातून लोकलने प्रवास करावा लागणार आहे.
सोमवारी मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा एक डबा पुणे रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यापूर्वीच रुळावरून घसरला. या घटनेत कोणताही प्रवासी जखमी झाला नाही.वंदे भारत ट्रेनच्या एका डब्याचे चाक डायमंड क्रॉसिंगवर रुळावरून घसरले. या क्रॉसिंगची प्राधान्याने पुनर्बांधणी केली जात आहे.
Post Views: 18











