May 15, 2026 4:41 pm

अंत्यविधीसाठी आलेल्या 55 वर्षीय व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या, घटनेनं शहर हादरलं

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

जालन्यात अंत्यविधीसाठी आलेल्या एका 55 वर्षीय व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या केली. हा धक्कादायक प्रकार गोंदेगाव शिवारात घडला होता, या घटनेनं जालना शहर हादरून गेले आहे.

संबंधित प्रकरणातील हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव समोर आले आहे. मच्छिंद्र दराडे (वय 55) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दराडे नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी आले असता, नंतर ते एका व्यक्तीसोबत बाहेर गेले. त्याचक्षणी एका अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर दगडाने हल्ला केला.

अज्ञात व्यक्तीने केलेला हल्ला इतका भीषण होता की, दराडे हे जागीच मृत पावले. घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिकांना तात्काळपणे पोलिसांना याबाबत माहिती दिली होती. प्रकरण पाहून जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचे एकूण गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला.

घटनास्थळाचा तपास करत प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. मच्छिंद्र दराडे यांची हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, ही माहिती अद्याप समोर आली नाही. या प्रकरणी मृताचा मुलगा पवन दराडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त समोर आले. संबंधित प्रकरणाचा पोलीस शोध घेत आहेत.

अशातच नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी आलेल्या व्यक्तीची हत्या होते, यावरून भलतीय संशयाची पाल चुकचुकतेय. या हत्येमुळे घटनास्थळी एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनं जालना जिल्हा हादरून गेला आहे. संबंधित प्रकरणात पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!