April 25, 2026 6:24 pm

पुण्याच्या वारजेत अंदाधुंद फायरीग

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुण्यातील वारजे परिसरात शुक्रवारी रात्री एका सलूनमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण शहर हादरलं आहे. मात्र, या थरारक घटनेचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला असून, यामध्ये पोलिसांच्या धाडसाचे दर्शन घडत आहे.

आरोपी गोळीबार करत असतानाच कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी त्याला जागेवरच झडप घालून ताब्यात घेतल्याने एक मोठा अनर्थ टळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वारजे भागात काल रात्री एका सलूनमध्ये पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर गोळीबार करण्यात आला. आरोपीने बंदुकीतून गोळ्या झाडताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांची पळापळ सुरू झाली. या गोळीबारात एक तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेचा जो सीसीटीव्ही समोर आला आहे, तो अत्यंत अंगावर काटा आणणारा आहे. ज्यावेळी आरोपी त्या तरुणावर गोळीबार करत होता, त्याच वेळी पोलीस पथक घटनास्थळाच्या अगदी समोर होते. गोळीबाराचा आवाज येताच आणि आरोपीच्या हातात शस्त्र दिसताच, पोलिसांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आरोपीच्या दिशेने धाव घेतली.

आरोपीकडून फायरिंग सुरू असतानाच पोलिसांनी त्याच्यावर झेप घेत त्याला ताब्यात घेतलं. जर पोलिसांनी काही सेकंदांचाही उशीर केला असता, तर आरोपीने आणखी गोळ्या झाडल्या असत्या किंवा गर्दीचा फायदा घेऊन पळ काढला असता. पोलिसांच्या या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली आहे.

सोशल मीडियावर आता या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. गोळीबाराच्या आवाजा मुळे लोक सैरावैरा धावत असताना, दुसरीकडे पोलीस आरोपीला पकडण्यासाठी धावत असल्याचे यात दिसत आहे. विशेष म्हणजे पुण्यात गेल्या काही दिवसांपासून टोळीयुद्ध आणि गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वारजे येथील या घटनेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी पकडलेल्या आरोपीची चौकशी सुरू असून, हा हल्ला नेमका कोणत्या वादातून झाला, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!