नांदेडसीटी तील कलाश्री सोसायटीत कलाश्री वाचनालयाच्या वतीने दि.२३ एप्रिल रोजी पुस्तक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.वाचनालर सुरु झाल्यानंतर हा आलेला पहिलाच पुस्तक दिन होता.
प्रारंभी पुस्तकाचं पुजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.सोसायटी सभासद सौ.चेतना जोग यांची बुक बबल टिम आणि कलाश्री वाचनालय टिम यांच्या संयुक्त पुढाकारातून लहान मुलांसाठी वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून स्टोरी टेलींग आणि बुक रिडींग हा उपक्रम आज सुरू करण्यात आला.लहान मुले मोठ्या संखेने आणि आवडीने ह्या कार्यक्रमात सहभागी झाली होती.
तसेच सोसायटीतील एक आदर्श मुलगी सर्वच क्षेत्रात नैपुण्य असणारी कु.प्रार्थना रसाळ ही नुकतीच दहावीच्या परीक्षेत ९४% गुण मिळवून पास झाली म्हणून वाचनालय समितीतर्फे तिचा सत्कार करण्यात आला.
त्याचप्रमाणे सोसायटीतील आदर्श सदस्या सौ.शुभांगी पळसुले यांनी ह्याच दिवशी तुकाराम गाथा हा ग्रंथ स्वहस्ताक्षरात लिहून पुर्ण केल्या बद्दल त्यांचा पण पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
विश्वगामी जेष्ठ नागरीक संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ज्ञानेश्वर सोळसकर यांनी उपस्थीतींना पुस्तकांच आणि पुस्तक वाचनाच महत्त्व पटवून दिलं.
ह्यावेळी कार्यक्रमास वाचनालय समितीचे आनुया कुरलेकर, प्रमोद मनवेलीकर,संजय भोसेकर,दिपक दोरीक, सौ.प्रिया रसाळ, सौ.मृणालिनी देवे,डि.पी यादव आणि मुलांचे पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानेश्वर सोळसकर यांनी केले.










