April 23, 2026 3:31 pm

आरटीओचा ट्रॅव्हल्सवर सर्जिकल स्ट्राईक

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी कंत्राटी बसविरोधात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जोरदार मोहीम हाती घेतली होती. गेल्या दोन दिवसांत केलेल्या धडक कारवाईत 290 बसची तपासणी करून 100 बसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

यामुळे खासगी बसचालकांचे धाबे दणाणले आहेत.”पादचारी व दुचाकीस्वार वाचवा अभियान 2026″ या मोहिमेअंतर्गत पुणे आरटीओ कार्यालयाने ही विशेष मोहिम हाती घेतली आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले, संदीप खडसे व सर्व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम सर्व मोटार वाहन निरीक्षक, सहा. मोटार वाहन निरीक्षक यांच्याकडून राबविण्यात आली.

दिनांक 17 व 20 एप्रिल 2026 रोजी पुण्यातील प्रमुख नाक्यांवर ही तपासणी करण्यात आली. यामध्ये स्वारगेट, कात्रज, नवले बिज, खेड शिवापूर, हडपसर, शिवाजीनगर आणि संगमवाडी या परिसराचा समावेश होता. या मोहिमेसाठी आरटीओने 8 विशेष पथके तयार केली होती, त्यामध्ये 45 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात होता.

या वेळी कागदपत्रांची वैधता संपणे, विनापरवाना बस चालवणे, टप्पा वाहतूक, मालवाहतूक, तांत्रिक दोष, आपत्कालीन दरवाजा सुस्थितीत नसणे, मद्यपान करून वाहन चालवणे, सीट बेल्टचा वापर न करणे आणि मोबाईलवर बोलणे, यासंदर्भातील कारवाई करण्यात आली.

फक्त दंड आकारून न थांबता, आरटीओ अधिकाऱ्यांनी बसमधील प्रवाशांशी थेट संवाद साधला. “सुरक्षित प्रवास हीच आपली जबाबदारी” या बीदवाक्यानुसार प्रवाशांना रस्ता सुरक्षेचे नियम आणि आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पादचारी व दुचाकीस्वार वाचवा अभियान 2026 अंतर्गत माहितीपत्रकांचे वाटपही करण्यात आले.

खासगी बसचालकांकडून जादा भाडे आकारले जात असल्यास किंवा प्रवासात काही अडचणी असल्यास प्रवाशांनी आपली तक्रार नाव, मोबाईल नंबर आणि तिकिटाच्या फोटोसह 8275330101 या व्हॉट्‌‍सॲप क्रमांकावर किंवा mh12 prosecution. rtopune@gmail. लेा या ईमेलवर नोंदवावी, असे आवाहन आरटीओतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!