April 22, 2026 4:03 pm

शरद पवारांनी काल मला फोन केला अन् म्हणाले…. देवेंद्र फडणवीसांनी बारामतीकरांना काय सांगितलं?

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

अजित पवार यांच्या अपघाती निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे. आज प्रचाराच्या सांगता सभेलामहायुतीच्या उमेदलार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते.

यावेळी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दर्शविणाऱ्या महाविकास आघाडीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी धन्यवाद दिले. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा विशेष नामोल्लेख फडणवीस यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांचे दुपारी चार वाजता बारामती विमानतळावर आगमन झाले. दौंडचे आमदार राहुल कुल, भाजपचे नेते वासुदेव काळे, प्रदीप गारटकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केले. अजित पवार यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी शारदा प्रांगणावरील सभेला हजेरी लावली. अजित पवार यांच्या आठवणी जागवून त्यांनी सुनेत्रा पवार यांच्यामागे भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी फोन केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीकरांना सांगितले. आमचा पाठिंबा सुनेत्रा पवार यांनाच असून आघाडीही त्यांच्या मागे उभी असल्याचे शरद पवार यांनी मला सांगितले, असे समस्त बारामतीकरांसमोर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. याबद्दल त्यांनी शरद पवार यांचे जाहीर आभारही मानले.

सुनेत्रा पवार या पोटनिवडणुकीत बहुमताचा रेकॉर्ड मोडतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. अजित पवार ज्याप्रमाणे राज्याच्या विकासाचा गाडा ओढत होते, त्याप्रमाणे सुनेत्रा वहिनींनी देखील खमक्यापणाने पुढे येऊन उत्तम काम करीत असल्याचे फडणवीस म्हणाले.

बारामतीच्या तीन पिढ्या दादांच्या विचारांशी मनापासून जोडलेल्या आहेत. ही केवळ साथ नाही तर भावनेने बांधलेली घट्ट कौटुंबिक नाळ आहे. म्हणूनच तीन पिढ्यांचा विश्वास, आपुलकी हीच दादांच्या कार्याची खरी ताकद आहे. मी एका संघर्षयोद्ध्याची सहचारिणी आहे. दादा गेल्यानंतर संपूर्ण राज्याने प्रेम दिले. मला आणि माझ्या दोन्ही मुलांवर भरभरून प्रेम केले, असे सांगताना राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावुक झाल्या होत्या.

सुनेत्रा पवार यांच्या भाषणाआधी अजित पवार यांची चित्रफित दाखविण्यात आली. ही चित्रफित पाहून सुनेत्रा पवार यांच्यासह मंचावरील अनेक नेते भावुक झाले. चित्रफित सुरू असताना सुनेत्रा पवार अनेकदा रडल्या. भाषणात अजित पवार यांच्या विचारांना उजाळा देताना त्यांच्यासारखेच काम करून दाखवेन, असा विश्वास व्यक्त करताना मी संघर्ष योद्ध्याची सहचारिणी असल्याचे त्या म्हणाल्या.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!