April 23, 2026 2:17 pm

*डोंबिवलीत इमारतीच्या बेसमेंटमध्ये आगीचा भडका

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

डोंबिवली पूर्वेतील चेडा नगर परिसरात रविकिरण सोसायटीतील राज अपार्टमेंटच्या बेसमेंट पार्किंगमध्ये पहाटे अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. जय भारत स्कूलजवळील या इमारतीत सुमारे 4.15 वाजता आगीचा भडका उडाला.

पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 29 दुचाकी काही मिनिटांत जळून खाक झाल्या.

आग लागल्यानंतर दाट धूर संपूर्ण इमारतीत पसरल्याने झोपेत असलेले रहिवासी घाबरून जागे झाले. भीतीच्या वातावरणात अनेकांनी तत्काळ इमारतीबाहेर धाव घेतली. या गोंधळात पाच जणांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत अग्निशामक दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करत काही वेळातच आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत पार्किंगमधील बहुतेक दुचाकींचे मोठे नुकसान झाले होते.

आगीमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किट किंवा इतर तांत्रिक बिघाडामुळे आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पोलिस आणि महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी पाहणी करून तपास करत आहेत. पहाटेची वेळ असल्याने मोठी जीवितहानी टळली, ही बाब दिलासादायक ठरली असली तरी मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!